Personality Test : जीवनात तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे फार महत्वाचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात ज्यातून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होत असतो. तुमचं बसणं-उठणं, चालणं, हावभाव यावरून तुमचा स्वभाव समजून घेता येत असतो. त्यासोबतच इतरही अनेक गोष्टी असतात. तुमच्यासमोर एक फोटो आहे ज्यात तुम्हाला तीन रंगीत खडे दिसत आहेत. तुम्हाला या तीनपैकी एका खडा निवडायचा आहे, तुम्ही जो खडा निवडाल त्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होईल. तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की, तुमच्या आवडत्या रंगानुसार यातील खडा निवडायचा नाहीये. तुम्हाला अशा दगडाची निवड करायची आहे जो पहिल्या नजरेत तुम्हाला आकर्षित करतो.
पहिला खडा - पहिला खडा हा निळ्या रंगाचा आहे. 'द माइंड जर्नल' नुसार, जर तुम्ही पहिला दगड निवडला असेल तर शक्य आहे की, तुम्हाला जीवनात सुरू असलेल्या गोंधळांपासून मुक्तता हवी आहे. जर तुम्ही निळा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे अनेक त्रास सहन करून मजबूत झाले आहात. तुम्ही एक संवेदनशील आणि सौम्य व्यक्ती आहात.
दुसरा खडा - दुसरा खडा हिरव्या रंगाचा आहे. जर तुम्ही हिरव्या रंगाचा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे त्यांच्या आजूबाजूला निगेटीव्ह एनर्जी अजिबात सहन करू शकत नाही. स्वत:ला निगेटीव्ह एनर्जीपासून वाचवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या लोकांमध्येही मिक्स होत नाहीत. तेच तुम्हाला दुसऱ्यांना माहीत म्हणता आलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्याऐवजी स्वत:च्या गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे.
तिसरा खडा - जर तुम्ही तिसरा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे जीवनात आशावादी विचार करतात. तुम्हाला तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स आवडतो. जेव्हा तुमच्या जीवनातील हा बॅलन्स बिघडतो तेव्हा तुम्हाला टेंशन येतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणं आवडतं.