मुरादाबाद: उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणानं त्याच्या पत्नीला प्रियकराकडे सोडलं आणि तिच्यासोबतचं नातं संपुष्टात आणलं. आठ महिने प्रियकरासोबत राहिल्यानंतर महिला फोन करून पतीशी बोलू लागली. याची माहिती प्रियकराला समजताच दोघांमध्ये वाद सुरू झाले. सोमवारी दोघांचं समुपदेशन झालं. त्यानंतर वाद संपुष्टात आला.
मझोलामध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा विवाह ५ वर्षांपूर्वी त्याच भागात राहणाऱ्या तरुणासोबत झाला. लग्नानंतर काही महिने आनंदात गेले. याच दरम्यान महिलेनं मुलीला जन्म दिला. एकदा पतीनं महिलेला कोणासोबत तरी फोनवर बोलताना पाहिलं. त्यानं याबद्दल विचारणा केली. त्यावर लग्नाआधी एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याच्याशी बोलत असल्याचं उत्तर महिलेनं दिलं. पत्नी आणि प्रियकराची भेट घडवण्याचा निर्धार पतीनं केला.
आठ महिन्यांपूर्वी पती त्याच्या पत्नीला प्रियकराकडे सोडून आला. त्यानं नातं संपुष्टात आणलं. महिला तिच्या माजी पतीसोबत फोनवर बोलत असल्याचं प्रियकराच्या लक्षात आलं. त्यानं याबद्दल महिलेला विचारलं. त्यावर मुलीसोबत बोलण्यासाठी पतीच्या मोबाईलवर कॉल केल्याचं तिनं सांगितलं. माजी पतीदेखील दुसरा विवाह करणार असल्याची माहिती तिनं प्रियकराला दिली.
महिला माजी पतीला फोन करत असल्यानं प्रियकर आणि तिच्यात वाद झाला. प्रियकरांनी महिलेला मारहाण केली. त्याची तक्रार महिलेनं एसएसपी कार्यालयाला केली. यानंतर समुपदेशकांनी महिला आणि प्रियकरासोबत संवाद साधला. आता दोघांनी एकत्र राहण्याची तयारी दर्शवली आहे. यापुढे माजी पतीसोबत बोलणार नाही, याची खात्री महिलेनं दिली आहे.