आपल्याला कधीही हाडांची समस्या उद्भवल्यावर डॉक्टर एक्स-रे करण्याचा सल्ला देतात. एक्स-रे केल्यानंतरच डॉक्टर वैद्यकीय उपचार करतात. पण, तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का, की या पृथ्वीवर एक्स-रेची सुरुवात कशी झाली, कोणत्या अवयवाचा आणि कोणत्या व्यक्तीचा सर्वप्रथम एक्स-रे काढण्यात आला?
एक्स-रे यंत्र कसे सुरू झाले?एक्स-रे मशीनचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्हेल्म रोएंटजेन यांनी लावला. रोंटगेन यांनी 1895 साली क्ष-किरणांचा शोध लावला. पण, एक्स-रे मशीनची औपचारिक ओळख 17 जानेवारी 1896 रोजी झाली. एच.एल.स्मिथ यांनी एक्स-रे मशीन मशीन सादर केली. एक्स-रे आरोग्य विश्वातील सर्वात मोठी क्रांती होती. यामुळे हाडांच्या संबंधित रोग ओळखणे सोपे झाले. विल्हेल्म रोंटगेनमुळेच आज आपण आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव स्पष्टपणे पाहू शकतो.
कोणत्या व्यक्तीचा पहिल्यांदा एक्स-रे काढलाकॅथोड रेडिएशनचा प्रयोग करताना क्ष-किरण विल्हेल्म रोंटगेन यांनी शोधून काढले. संशोधन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की क्ष-किरण करताना मानवी ऊती क्रॉस होतात आणि त्यामुळे हाडे दिसतात. विल्हेल्म रोंटगेन यांनी त्यांची पत्नी बर्थाच्या हाताचा पहिला एक्स-रे काढला. एका अहवालानुसार, आज जगात दर सेकंदाला 100 पेक्षा जास्त एक्स-रे होतात आणि एका वर्षात 4 अब्ज पेक्षा जास्त एक्स-रे केले जातात.