नेहमीच तुम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनवर गेले असाल तर लक्ष दिलं असेल की, एखाद्या रेल्वे ट्रॅकवर एक एकटं इंजिन उभं असतं. ते इंजिन सतत स्टार्ट असतं. इतकंच नाही तर जेव्हा तुमची ट्रेन स्टेशनवर येते तेव्हा ती सुटण्यासाठी वेळ असतो तरी सुद्धा ट्रेनचं इंजिन स्टेशनवरही स्टार्टच असतं. तुम्हाला माहीत आहे का की, ट्रेनच्या डीझल इंजिनला ऑफ का केलं जात नाही?
थांबलेलं डीझल इंजिन ऑन ठेवणं लोका पायलट म्हणजे ट्रेनच्या ड्रायव्हरची मजबुरी असते. डीझल इंजिनचं तंत्र इतकं किचकट असतं की, हे स्टेशनवर थांबवल्यावरही ऑफ केलं जात नाही. याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, जेव्हा ट्रेन थांबवली जाते तेव्हा इंजिन आपलं ब्रेक प्रेशर गमावतो. तुम्ही ट्रेन थांबल्यावर गॅस रिलीज केल्यासारखा आवाज ऐकला असेलच. हा आवाज या गोष्टीचा संकेत आहे की, ब्रेक प्रेशर रिलीज करण्यात आलं आहे. हे प्रेशर पुन्हा तयार होण्यासाठी काही वेळ लागतो. त्याशिवाय ट्रेन रोखण्यासाठी एका ठराविक प्रेशरची गरज असते. इंजिन बंद केल्यान प्रेशर कमी होतं. ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
कठीण असते ट्रेनचं सिस्टीम
याचं दुसरं कारण हे आहे की, ट्रेनचं इंजिन सुरू करण्यासाठी वेळ लागतो. कारण डीझल इंजिन एक मोठं यूनिट असतं ज्यात १६ सिलेंडर इंजिनचं इंजिन असतं. डीझल इंजिन कंप्रेशन इग्निशनवर काम करतं. त्यात स्पार्क प्लग म्हणजे बाहेरील इग्निशन एजेंट नसतं. जे पेट्रोल इंजिनमध्ये असतं. त्यामुळे जेव्हा डीझल इंजिन स्टार्ट केलं जातं तेव्हा ऑपटिमल वर्किंग टेम्प्रेचरची गरज असते जे एअर फ्यूल कम्प्रेशनने तयार होतं.
बंद होताहेत डीझल इंजिन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीझल इंजिन स्टार्ट करण्यासाठी जास्त इंधनाची गरज असते. दुसरीकडे जेव्हा हे इंजिन स्टेशनवर उभं असतं तेव्हाही यात इंधनाचा वापर होतो. कारण तेव्हा इंजिनची बॅटरी इंधनाच्या मदतीने चार्ज होते. आता अनेक इंजिनांमध्ये ऑक्जिलरी पॉवर यूनिटचा वापर होतो. ज्याने इंधन कमी खर्च होतं. या यूनिटमुळे बॅटरी चार्ज केली जाते. इंधनाच्या जास्त वापरामुळे डीझल इंजिन बंद केले जात आहेत.