Avengers Endgame या सिनेमाचं सध्या चाहत्यांना फारच वेड लागलेलं दिसतंय. हा सिनेमा बघण्यासाठी कुणी ऑफिसमधून सुट्टी घेत आहेत तर कुणी आणखी काही कारण सांगताहेत. दक्षिण कोरियातील Avengers सिनेमाचा फॅन असलेल्या एका जवानाने असाच कारनामा केला. इथे एक जवान ड्युटी सोडून तीन तास Avenegres Endgame सिनेमा बघायला गेला. जेव्हा तो ड्यूटीवर दिसला नाही तेव्हा त्याचा शोध सुरू झाला. नंतर अधिकाऱ्यांना कळाले की, तो सिनेमा बघायला गेला. सिनेमा सुटल्यावर अधिकाऱ्यांनी त्याला थिएटरबाहेरच अटक केली.
टॅक्सी ड्रायव्हरने केली पोलखोल
मार्व्हल सिनेमाचा हा फॅन असलेला हा जवान १८ सैनिकांच्या बटालियनचा भाग होता. जेव्हा तो ड्यूटीवर दिसला नाही तर अधिकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला होता. विचारपूस करत असताना एका टॅक्सी ड्रायव्हरने जवान थिएटरमध्ये गेल्याचे सांगितले. याच टॅक्सी ड्रायव्हरने जवानाला थिएटरमध्ये सोडलं होतं.
थिएटरबाहेरच अटक
जवान जेव्हा पूर्ण सिनेमा बघून थिएटरबाहेर आला तेव्हा त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली. जवानाने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला Avengers सिनेमा बघायचा होता, त्यामुळे मी माझी साइट सोडून सिनेमा बघायला गेलो'. आता त्याची न सांगता ड्युटी सोडून गेल्याने चौकशी सुरू केली आहे.
दक्षिण कोरियात सेनेत जाणं अनिवार्य
या जवानाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. पण तो रिपब्लिक ऑफ कोरिया एअरफोर्समध्ये कार्यरत होता. दक्षिण कोरियामध्ये १८ ते २८ वयोगटातील पुरूषांना सेनेत सामिल होणं अनिवार्य आहे.