एक नंबर ना भौ! प्रवासी मजूराचं नशीब चमकलं, ४० रूपयांची लॉटरी काढून बनला लखपती...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:22 PM2021-03-06T16:22:47+5:302021-03-06T16:23:15+5:30
प्रतिभा एका प्रवासी मजूर आहे आणि तिरूवनंतपुरममध्ये बांधकाम साइटवर काम करण्यासाठी पोहोचला होता. त्याने ४० रूपयांची लॉटरी तिकीट खरेदी केली.
कधी कधी असं असतं की कुणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे केरळमधून. इथे एक मजूराला लॉटरी लागली आहे. केरळ सरकारकडून काढली जाणारी साप्ताहिक कारूण्य प्लस लॉटरीमध्ये पश्चिम बंगालचा मजूर प्रतिभा मण्डल बाजी मारत ८० लाख रूपयांचं बक्षीस जिंकलं आहे.
प्रतिभा एका प्रवासी मजूर आहे आणि तिरूवनंतपुरममध्ये बांधकाम साइटवर काम करण्यासाठी पोहोचला होता. त्याने ४० रूपयांची लॉटरी तिकीट खरेदी केली आणि नशीबाने त्याला ती लॉटरी लागली. अचानक मिळालेल्या या रकमेमुळे तो आनंदी आहे आणि थोडी भीतीही आहे. त्याला समजत नव्हतं की, इतकी मोठी रक्कम घेऊन कुठे जायचं. त्याचं बॅंक अकाउंटही नव्हतं.
प्रतिभा थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने सुरक्षेची मागणी केली. यानंतर पोलिसांनी कॅनरा बॅंक कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि प्रतिभाचं अकाउंट उघडून दिली. लॉटरीतून मिळालेले पैसे लॉकरमध्ये ठेवले आहेत. लॉटरी जिंकल्यानंतर पोलीसच त्याला बॅंकेत घेऊन गेले आणि नंतर घरी सोडून आले.
जर ही लॉटरी कोणत्याही व्यक्तीला लागली आणि ५ हजारांपेक्षा कमी रक्कम जिंकली असेल तर केरळमधील कोणत्याही लॉटरी सेंटरमधून पैसे मिळू शकतात. तेच ५ हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तिकीट आणि आयडी प्रूफ घेऊन सरकारी लॉटरी ऑफिस किंवा बॅंकेत दाखवावं लागतं. लॉटरीचा जो विजेता असतो त्याला ३० दिवसांच्या आत लॉटरी तिकीट व्हेरीफाय करायची असते.