काही लोकांचं त्यांच्या प्रोफेशनवर फारच प्रेम असतं. तर काही लोक आपलं मन मारून घर चालवण्यासाठी नोकरी करतात. बरेच लोक त्यांच्या कामाबाबत सोशल मीडियावर गर्वाने सांगतात. पण काही लोक लपवतात. तेच काही असे प्रोफेशन असतात जे समाजातील लोकांच्या नजरेत चुकीचे असू शकतात, पण त्या कमाईतून त्यांचं घर चालतं. एका महिलेने तिच्या प्रोफेशनसंबंधी सत्य जगाला सांगितलं.
महिला स्ट्रिपरने केले खुलासे
केंटकीची राहणारी २० वर्षीय पामेला कॉर्मेनने पोल डान्सिंग आणि स्ट्रिपिंगच्या विश्वास सत्य सांगितलं. एका बारमध्ये स्ट्रिपर म्हणून काम करणाऱ्या पामेलाने तिच्या नोकरीच्या अडचणींबाबत मोकळेपणाने सांगितलं. 'डेली स्टार' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तिला आठवड्यातून पाच दिवस साधारण एकसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तिने सांगितलं की, सोशल मीडिया साइट्सवर जे स्ट्रिपर्स भरपूर पैशांसोबत फोटो काढते, हे एक प्रकारचं मार्केटिंग आहे. स्ट्रिपिंगच्या जगाचं सत्य इतकं ग्लॅमरस आणि ब्राइट नाही. यामागे डिप्रेशन आणि वेदना लपली आहे.
कमाईचं सत्य
पामेलाने सांगितलं कधी कधी ती एका रात्री ५० अमेरिकन डॉलर म्हणजे तीन ते चार हजार रूपये कमावते. तर कधी कधी एक रूपयाच मिळतो. कधी जर क्लब रिकामा राहिला तर आणखी अडचण होते. क्लबमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येवर प्रभाव टाकते. ज्या दिवशी काम नसतं तेव्हा तिला खर्च चालवण्यासाठी क्लबमधून उधार घ्यावे लागतात. पामेलाने सांगितलं की हे सोपं काम नाही. यात तुमच्या नेहमीच नोटा उडवल्या जातील याची काही गॅरंटी नाही.
दुसऱ्या महिलांना देते सल्ला
पामेला म्हणाली की, ती या प्रोफेशनमध्ये येणाऱ्या नवीन तरूणी आणि महिलांना सांगेल की, जर तुम्हाला या प्रोफेशनमध्ये यायचं असेल तर त्याआधी याची चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत जाणून घ्या. कारण जास्त कमाईसाठी या प्रोफेशनमधील तरूणींना रात्री उशीरापर्यंत काम करावं लागतं. सुरक्षेची काहीच गॅरंटी नसते. पामेला म्हणाली की, प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, जे काम करणं चांगलं वाटत नसेल ते अजिबात करू नये. मग समोरचा कितीही दबाव टाकत असेल तरी. कितीही पैसे ऑफर करत असेल तरी ते करू नये.