कधी तुम्ही एखाद्या अशा सरोवराबाबत ऐकलंय का ज्याचा रंग कोका कोलासारखा दिसतो? कदाचित ऐकलं नसेल. मात्र, ब्राझीलमध्ये एक असं सरोवर आहे ज्यातील पाण्याचा रंग कोका कोलासारखा आहे आणि ज्याचं नाव कोका कोला आहे. कोला कोलासारख्या रंगाचं पाणी असलेल्या या सरोवरात तुम्ही आरामात स्वीमिंग करू शकता आणि याचे अनेक मेडिसिनल बेनिफिट्सही तुम्हाला मिळतात. आपल्या नावामुळे आणि पाण्यातील गुणामुळे इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
रिपोर्ट्सनुसार, येथील सरोवरातील माती आणि पाण्यात काही मिनरल्स आहेत जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. ब्राझीलच्या टूरिज्मच्या अधिकृत वेबसाइटवरही लिहिलं आहे की, कोका कोला सरोवरात Rejuvenating Properties आहे.
या सरोवराचा रंगही तुम्हाला आकर्षित करतो. या सरोवराची नॅच्युरल वॉटल बॉडी आंघोळ, स्वीमिंग आणि बोटिंगसाठी सेफ आहे. तेच स्थानिक लोक या सरोवराच्या Healing Powers बाबत दावा करतात की, येथील पाण्यात आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
या सरोवराचं मूळ नाव Araraquara आहे. पण आपल्या रंगामुळे याचं नाव कोका कोला पडलं आहे. अटलांटिक रेनफॉरेस्ट रिझर्व Mata da Estrela मध्ये असलेलं हे सरोवर कार्बोनेटेडही नाही आणि प्रदूषितही नाही. याचा रंग पाहिल्यावर पहिल्यांदा हे पाणी प्रदूषित असल्याचं दिसतं. पण तसं नाहीये.
या सुंदर ठिकाणावर पोहोचण्यासाठी जंगलातून साधारण ५ तास वॉक करत जावं लागतं. गेल्या काही वर्षापासून हे ठिकाण ब्राझीलमध्ये सर्वात वेगळं आणि खास टूरिस्ट अट्रॅक्शन म्हणून समोर आलं आहे. अनेक लोक इथे या सरोवरातील पाण्याच्या मेडिकल बेनिफिट्समुळे इथे येतात. काही तर फक्त या सरोवराच्या नावामुळे याकडे आकर्षित होतात.