भारतात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहे. येथील समाज वेगवेगळ्या रिती-रिवाजांचं पालन करतो. त्यासोबतच काही अजब मान्यताही मानल्या जातात. त्यांबाबत वाचल्यावर कुणीही चक्रावून जाईल. अशीच एक मीनारशी संबंधित अजब मान्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं म्हणतात की, या मीनारवर भाऊ-बहीण एकत्र चढून जाऊ शकत नाही. चला जाणून घेऊ कारण..
लंका मीनार
ही अजब मान्यता लंका मीनारबाबत आहे. ही मीनार रावणाला समर्पित आहे. ही मीनार उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात आहे. लंका मीनारच्या आत रावणाचा संपूर्ण परिवार चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. ही काही फार मोठी मीनार नाही. पण अजब मान्यतेमुळे पर्यटक इथे येतात. ही बघण्यासाठी दुरदुरून लोक येतात. (हे पण वाचा : 'या' नवाबाने आवडत्या कुत्रीच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा केला होता खर्च, किती तो वाचा!)
का केलं गेलं निर्माण
या मीनारच्या निर्माणाची कहाणी फारच इंटरेस्टींग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मीनार १८५७ मध्ये मथुरा प्रसाद नावाच्या व्यक्तीने बनवली होती. असं म्हणतात की, मथुरा प्रसादने रावणाच्या आठवणीत या ही मीनार बांधली होती. त्यामुळे याचं नाव लंका मीनार आहे.
रावणाची भूमिका
मथुरा प्रसाद एक कलाकार होता. ते रामलीलेत रावणाची भूमिका साकारत होते. असे म्हणतात की, रावणाची भूमिका करता करता त्यांच्यावर त्याचा अशा प्रभाव पडला की, त्याने रावणाच्या स्मृतीसाठी ही मीनार बनवली. मथुरा प्रसाद रामलीलेचं आयोजन करत होते. त्यांच्या रामलीलेत हिंदू-मुस्लिम एकत्र काम करत होते.
स्थानिक लोकांनुसार लंका मीनार तयार करायला २० वर्ष कालावधी लागला. तेच ही मीनार बांधण्यासाठी शिंपले, उडद आणि कवड्यांचा वापर करण्यात आला. असं मानलं जातं की, ही मीनार तयार करण्यासाठी १ लाख ७५ हजार रूपये खर्च आला होता.
१८० फूट लांब देवतेची मूर्ती
इथे कुंभकरण आणि मेघनाथची विशाल मूर्तीही स्थापन केली आहे. कुंभकर्णची मूर्ती १०० फूट उंच आहे. तर मेघनाथची मूर्ती ६५ फूटाची आहे. इथे तुम्हाला भगवान शिवासोबत चित्रगुप्ताचीही मूर्ती बघायला मिळते. तसेच १०८ फूट लांब नाग देवतेचीही मूर्ती इथे आहे.
जाऊ शकत नाही भाऊ-बहीण एकत्र
लंका मीनारबाबत एक अजब मान्यता आहे. त्यानुसार भाऊ-बहीण एकत्र मीनारीच्या वर जाऊ शकत नाही. मीनारच्या वर जाण्यासाठी ७ प्रदक्षिणा घालाव्या लागतात. ज्या भाऊ-बहिणीकडून केल्या जाऊ शकत नाही. हेच कारण आहे मीनारीच्या वर भाऊ-बहीण एकत्र जाणं योग्य मानलं जात नाही. याला अंधविश्वासही म्हटलं जाऊ शकतं. पण अनेक वर्षांपासून लोक या मान्यतेचं पालन करतात.