शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

जगातील सगळ्यात मोठा बॅंक दरोडा, एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा होता सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 5:16 PM

या दरोड्यात एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा सहभागी होता. अर्थातच ही हैराण करणारी बाब आहे. पण सत्य आहे. 

तुम्ही जगातल्या अशा अनेक दरोड्यांबाबत ऐकलं असेल ज्यात लाखों किंवा कोट्यवधी रूपये लुटले गेले होते. पण आज आम्ही तुम्हाला बॅंकेवर टाकलेल्या एका अशा दरोड्याबाबत सांगणार आहोत, ज्याला बॅंक दरोड्याच्या इतिहासातील सर्वात वेगळी घटना मानलं जातं. कारण या दरोड्यात एका देशाच्या राष्ट्रपतीचा मुलगा सहभागी होता. अर्थातच ही हैराण करणारी बाब आहे. पण सत्य आहे. 

या दरोड्यातून एकूण एक बिलियन डॉलर म्हणजे आजच्या हिशेबाने साधारण 7562 कोटी रूपये लुटले गेले होते. हा दरोडा इराकमध्ये टाकण्यात आला होता. येथील सेंट्रल बॅंकेतून इतकी मोठी रक्कम लुटण्यात आली होती. या घटनेला आता 17 वर्षे झाली आहेत.

मार्च 2003 मधील ही घटना आहे. त्यावेळी इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन हे होते आणि त्यांची अमेरिकेसोबतची शत्रूता जगजाहीर होती. असे म्हणतात की, इराकने अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी सद्दाम हुसेनचा मुलगा कुसय बगदाद येथील इराकी सेंट्रल बॅंकेत पोहोचला आणि बॅंकेच्या प्रमुखाच्या हाती एक कागद दिला. या कागदावर लिहिले होते की, सुरक्षा कारणांमुळे बॅंकेतील सर्वच रक्कम राष्ट्रपतींनी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आदेश दिला आहे. 

आता त्यावेळी सद्दाम हुसेनची लोकांमध्ये इतकी भीती होती की, त्याचा आदेश धुडकावणं कुणालाही शक्य नव्हतं. त्यामुळे बॅंकेच्या प्रमुखाने पैसे घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्याच्या दुसरा कोणता मार्गही नव्हता.

असे सांगितले जाते की, सद्दाम हुसेनचा मुलगा कुसयने इराकी बॅंकेतून इतके पैसे लुटले होते की, त्याला ते घेऊन जाण्यासाठी कितीतरी ट्रक लागले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लुटलेली रक्कम ट्रकांमध्ये भरण्यासाठी त्याला 5 दिवस लागले होते.

असेही सांगितले जाते की, रक्कम इतकी होती की, ती भरण्यासाठी त्याच्याकडे ट्रकही शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे काही रक्कम तिथेच सोडावी लागली.या दरोड्याबाबत जगाला तेव्हा कळाले जेव्हा या घटनेनंतर लगेच अमेरिकन सेनेने इराकवर बॉम्ब हल्ला सुरू केला. दरम्यान सेंट्रल बॅंकेवरही त्यांनी ताबा मिळवला.

पण त्यांना कळाले की, बॅंकेतील सगळे पैसे तर सद्दामचा मुलगा घेऊन गेला. त्यानंतर या घटनेची चौकशी सुरू झाली. सद्दाम हुसेनच्या महालाचीही झडती घेण्यात आली. इथे मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली. पण ही रक्कम बॅंकेतून लुटलेली नव्हती. ही रक्कम सद्दामचा दुसरा मुलगा उदयने आधीपासून सांभाळून ठेवलेली होती. कारण त्याला मोठी रक्कम जमा करण्याची आवड होती. असे मानले जाते की, इतरही काही ठिकाणांची झडती घेण्यात आली. त्या ठिकाणांहून कोट्यवधी रूपये मिळाले. मात्र, अजूनही बॅंकेतून लुटलेल्या रकमेतील मोठा भाग मिळाला नव्हता.  

अंदाज लावला जात होता की, सद्दाम हुसेनने ते पैसे सीरियाला पाठवले असतील. पण याचा काहीच पुरावा नव्हता. हा दरोडा दरोड्यांच्या इतिहासातील सर्वात वेगळा दरोडा होता. कारण या दरोड्यात एकही गोळी चालवली गेली नाही किंवा कुणाचं रक्त सांडलं नाही. जे झालं ते सगळं सहज झालं होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके