वडाचं झाडं दीर्घकाळ जगणारं आणि विशाल असं असतं. हिंदू परंपरांनुसार वडाच्या झाडांची पुजा केली जाते. वडाची झाडं फक्त भारतातचं नाही तर जगभरात दिसून येतात. भारतात सगळ्यात मोठं वडाचं झाड आहे. या झाडाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. या झाडाला द ग्रेट बनियन ट्री च्या नावाने ओळखलं जातं. हे झाड २५० वर्ष जुनं आहे.
हे भलं मोठं वडाचं झाड कोलकत्यामधील आचार्य जगदीशचंद्र बोस बॉटनिकल गार्डनमध्ये आहे. १७८७ मध्ये या झाडाची लागवड झाली. यावेळी त्याचं वय २० वर्ष होतं. या झाडाची मुळं संपूर्ण जंगलात पसरली आहेत. १४ हजार पाचशे मीटरमध्ये पसरलेलं हे झाडं जवळपास २४ मीटर उंच आहे. या झाडांच्या पारंब्या ३ हजारापेक्षा जास्त आहेत. म्हणूनच या झाडाला वॉकिंग ट्री असं सुद्धा म्हटलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण या झा़डावर ८० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी वास्तव्यास आहेत.
१८८४ आणि १९२५ मध्ये कोलकात्यामवध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे या झाडाचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे या झाडाच्या अनेक फांद्या कापाव्या लागल्या होत्या. १९८७ मध्ये भारत सरकारने या विशालकाय वडाच्या झाडाचे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे प्रतीक म्हणून चिह्न सुद्धा तयार केले होते.
या झाडाची देखभाल करण्यासाठी १३ लोकांची टिम तैनात करण्यात आली आहे. यात बॉटनिस्ट पासून माळीपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या झाडाची वेळोवेळी तपासणी करून काळजी घेतली जाते.