नाशिक : नाशिक शहर कॉँग्रेस सेवादलाच्या वतीने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉँग्रेस भवन येथे साकारलेल्या सर्वात मोठ्या गांधी टोपीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये झाली आहे. कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना लिम्का बुक आॅफ रेकॉर्डचे चिफ एडिटर विजया घोस यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून, तसे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. वसंत ठाकूर यांनी सेवादलाच्या माध्यमातून ३ बाय ५० फुटाची गांधी टोपी तयार करून ती प्रदर्शित केली होती. त्यातून महात्मा गांधी यांचा खादीचा प्रचार करण्याचे काम करण्यात आले होते. गांधी टोपीचे महत्त्व तरुण पिढीपुढेही यावे, यासाठी ही आगळीवेगळी गांधी टोपी बनविण्यात आली होती, असे ठाकूर यांनी सांगितले. सदर गांधी टोपीची नोंद गिनिज बुकमध्येही होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे
सर्वात मोठी गांधी टोपी; लिम्का बुकमध्ये
By admin | Published: February 14, 2017 4:33 PM