World's Largest Scotch Whisky Bottle: 32 वर्षे जुन्या मॅकलन (Macallan) ब्रँडच्या 311 लिटर मोठ्या स्कॉच व्हिस्की (Scotch whisky) बॉटलची जगातील सर्वात मोठी बॉटल म्हणून गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या बॉटलचा येत्या 25 मे रोजी लिलाव होणार आहे. द इंट्रेपिड नावाने ओळखली जाणारी ही बॉटेल 5 फूट 11 इंच लांब आहे.
WalesOnline नुसार दावा करण्यात येतो की, या बॉटला सर्वात मोठी बोली लागू शकते. तसेच, ही सर्वात मोठी बोली लागण्याचा रेकॉर्ड(1.9 मिलियन डॉलर) तोडू शकते. म्हणजेच या बॉटलच्या किमतीत चार लॅम्बोर्गिनी लग्झरी कार खरेदी करता येतील. या बॉटलला £1.3 मिलियनपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास त्यातील 25 टक्के मॅरी क्यूरी चॅरिटीला दान केले जाणार आहेत.
32 वर्षे जुनी आहे मॅकलन व्हिस्की बॉटलया बॉटलमधील व्हिस्कीला 32 वर्षांपासून मॅकलनच्या स्पाईसाइड गोदामात जतन करुन ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीय व्हिस्की बॉटलिंग कंपनी डंकन टेलर स्कॉच व्हिस्कीने याला मोठ्या बॉटलमध्ये टाकून ठेवले. व्हिस्कीबाबत असे बोलले जाते की, याला जितके वर्षे जतन करुन ठेवले जाईल, तितकी ती स्ट्राँग बनते. त्यामुळेच या बॉटलला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.