अयोध्येत राममंदिराच्या निर्माणासाठी आज भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उपस्थित राहून भूमीपूजन सोहळ्याला हजेरी लावली. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक होते. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहिले. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली होती.
अनेक दशकांपासून राम मंदिराबाबत वादविवाद सुरू होते. अखेर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रसंगाचे औचित्य साधून भारताचे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीत असलेल्या रामाच्या फोटोचा उल्लेख सोशल मीडियावर केला आहे.
भारतीय संविधानाची मुळ प्रत हाताने लिहिण्यात आली होती. प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या पानावर काही फोटो आहेत. त्यातील संविधानाच्या तृतीय अध्यायाच्या आधी प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचे फोटो आहेत. ज्याावेळी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परत आले होते. त्यावेळचा हा फोटो आहे. संविधानातील तृतीय अध्यायाशी याचा संबंध आहे.
याआधी सुद्धा सोशल मीडियावर संविधानातील प्रभू श्रीरामांच्या फोटोबाबत महिती देण्यात आली होती. रविशंकर यांनी या ट्विटरवर कॅप्शन दिलं आहे की, ''भारताच्या संविधानाच्या मुळ प्रतीवर एक फोटो आहे. ज्यात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, माता सीता आणि बंधू लक्ष्मण हे रावणाचा वध केल्यानंतर अध्योध्येत परतल्याचे दृश्य आहे. आज संविधानाच्या मुळ भावनेला मी आपल्यासह शेअर करत आहे. ''
कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार
भारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार? भारत बायोटेकचा मानस