नेहमीच वेगवेगळ्या ब्रॅन्डची विचित्र नावे समोर येत असतात. असंच एका ब्रॅन्डचं नाव चर्चेचा विषय ठरत आहे. लंडनमध्ये राहणारा पाकिस्तानचा डिजिटल आर्टिस्ट लवकर 'बिर्याणी परफ्यूम' लॉन्च करणार आहे. 'Le Biryani With Aloo' असं या परफ्यूमचं नाव असू लोक हे खायचं कि लावायचं यात कन्फ्यूज झाले आहेत.
२२ वर्षीय 'Digink' फ्लेवर्ड तांदूळ अत्तरात टाकून सुगंधित परफ्यूम तयार केलं आहे. या परफ्यूमला त्याने एका आकर्षक अशा बाटलीतही टाकलं आहे. आता या बाटलीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
'Le Biryani With Aloo' परफ्यूमचे फोटो व्हायरल झाले असून बॉलिवूड अभिनेत्यांपासून ते राजकीय लोकही हे फोटो शेअर करत आहेत. ट्विटरवर 'My Curry is Popping' नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, हे परफ्यूम सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही. याचे केवळ काही प्रॉडक्टच मिळणार आहेत.
Metro.co.uk सोबत बोलताना या व्यक्तीने सांगितले की, मी बिर्याणी परफ्यूमचा वापर करतो. भाजलेल्या कांद्यासारखा सुगंध आणि बिर्याणीसारखा सुगंध असलेल्या या परफ्यूमपासून बिर्याणी प्रेमी दूर राहू शकणार नाहीत.
भाजलेल्या कांद्याचा सुगंध जास्त लोकांना पसंत नसेल, पण कधीतरी तुम्ही असा विचार केला होता का की, या सुगंधाचा कुणी कधी परफ्यूमही वापरेल? पण आता हे होत आहे.
कशी आली याची आयडिया?
या परफ्यूमची आयडिया कशी आली, असं विचारल्यावर या व्यक्तीने सांगितले की, माझा एक मित्र मला भेटायला आला होता. त्याने मला 'शान' बिर्याणी मसाला दिला होता. जेव्हाही माझा मित्र बिर्याणी करत होता, तेव्हा संपूर्ण अपार्टमेंटमध्ये बिर्याणीचा सुगंध दरवळत होता. तेव्हाच मला याची आयडिया सुचली.