आफ्रिकन देशातील एका मुलाच्या प्रामाणिकपणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मुलाला रस्त्यावर 38 लाखांची रोखड सापडली अन् त्याने जे केले ते पाहून सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक होत आहे. त्याने दाखवलेल्य प्रामाणिकपणाच्या बक्षिसाची चर्चा अधिक रंगली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इमॅन्युएल टुलो असे या 19 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो मूळचा पश्चिम आफ्रिकी देश लायबेरियाचा आहे. तो मोटारसायकल टॅक्सी चालक म्हणून काम करायचा. मात्र त्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च भागत नव्हता.
एके दिवशी त्याला रस्त्याच्या कडेला लायबेरियन आणि अमेरिकन नोटांनी भरलेली बॅग दिसली. त्यात सुमारे 38 लाख रुपये होते. त्यानंतर त्याने हे पैसे आपल्या काकीला दिले आणि सांगितले की जर कोणी सरकारी रेडिओवर या पैशासाठी आवाहन केले तर तो तिला देईल. लोक इमॅन्युएलच्या प्रामाणिकपणाची चेष्टा करू लागले आणि गरिबीत मरणार असं म्हणून लागले. पण त्याला त्याच्या या प्रामाणिकतेचे खूप मोठे बक्षीस मिळाले.
इमॅन्युएलला लायबेरियातील सर्वात प्रतिष्ठित शाळेत, रीक्ट इंन्स्टूट मध्ये प्रवेश मिळाला. राष्ट्रपती जॉर्ज व्हिया यांनी इमॅन्युएलला सुमारे 8 लाख रुपये दिले. एका स्थानिक मीडिया मालकाने त्याला प्रेक्षक आणि श्रोत्यांकडून मिळालेले पैसेही दिले. इमॅन्युएलला ज्या व्यक्तीचे पैसे मिळाले होते, त्याने त्या मुलाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वस्तूही दिली. याशिवाय अमेरिकेतील एका महाविद्यालयाने त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण शिष्यवृत्ती देण्याची ऑफर दिली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की बहुतेक लायबेरियन मुलांना गरीब कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे शाळा सोडून काही नोकरी करावी लागते. वयाच्या 9 व्या वर्षी वडिलांचा आधार गमावल्याने त्याला शाळा सोडावी लागली. त्यावेळी त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी कमाईचे साधनही शोधू लागला. नंतर मोटारसायकल टॅक्सी चालवून काही पैसे कमवू लागले. तो त्याच्या काकीकडे राहू लागला. याच दरम्यान, रस्त्याच्या कडेला त्यांना पैशांची बॅग सापडली. ज्याने त्याचे आयुष्य बदलले.
माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला 6 वर्षे लागतील. आणि वयाच्या 25 व्या वर्षी तो पदवीधर होईल. इमॅन्युएल म्हणाले की तो विद्यापीठात अकाउंटिंगचा अभ्यास करणार आहे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यात तो हातभार लावू शकेल. माझा सर्व लोकांना संदेश आहे की प्रामाणिक असणे चांगले आहे, इतरांचे सामान घेऊ नका असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.