पर्यावरणाप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जनजागृती आणि पर्यावरणाला वाचवण्याचे संदेश देत असतो. अनेकजण झाडं लावण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतात. पण ८ वर्षाच्या लहान मुलीची पर्यावरणाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम पाहून तुम्ही भारावून जाल. तुमचा विश्वास बसणार नाही पण ८ वर्षाच्या एका चिमुरडीने ५० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत. लिसप्रिया असं या मुलीचं नाव आहे.
जलवायू परिवर्तानाविरूध्द आवाज उठवत असलेल्या लोकांमध्ये एक भारतीय मुलगी सुद्धा सहभागी आहे. या मुलीने वयाच्या अवघ्या ८ वर्षात ५१ हजार झाडं लावली आहेत. म्हणजेच आत्तासुद्धा ती १६ झाडं दिवसाला लावत आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळ येथिल रहिवासी असणारी ही मुलगी आहे. इतकंच नाही तर अनेक देशांचा दौरा सुद्धा या मुलीने केला आहे. २०१८ मध्ये ही मुलगी पहिल्यांदाच मंगोलियाला गेली होती. त्यानंतर आपल्या वडिलांच्या मदतीने त्यांनी द चाईल्ड मुव्हमेंट नावाच्या संस्थेची स्थापना केली. ही मुलगी संसदेपर्यंत सुद्धा गेली आहे. ( हे पण वाचा-रोज सुमारे २५० आदिवासी मुलांची भूक भागवतात 'हे' आजोबा)
लिसप्रिया जास्त वेळ आपल्या मुळ शहरापासून लांब असल्यामुळे तिला तिची शाळा सुद्धा सोडावी लागली होती. गेल्या काही दिवसांपासून या मुलीची तुलना ग्रेटा थनबर्ग यांच्यासोबत केली जात आहे. त्यावर माझी तुलना ग्रेटाशी करू नका असं लिसप्रियाचं म्हणणं आहे. पुढच्या पिढ्यांचे आयुष्य चांगलं करण्यासाठी एक पाऊल पुढे चालण्याचा तिचा विचार आहे. ( हे पण वाचा-दोन वर्ष तिनं प्रेमानं रोपटं सांभाळलं अन् पुढे भलतंच घडलं)