सध्या नेटफ्लिक्सवर नार्कोस ही एका ड्रग डिलरवर आधारीत सीरिज चांगलीच गाजत आहे. ही एक सत्यकथा असून जगातला सर्वात मोठा ड्रग डिलर पाब्लो अॅस्कोबार याच्यावर ती आधारीत आहे. पाब्लोने या काळ्या धंद्यातून इतका पैसा कमावला होता की, त्याच्याकडील गोदामात ठेवलेले त्याचे करोडों रुपये उंदीर खाऊन टाकायचे. इतकेच काय आज जर तो जिवंत असता तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त पैसा त्याच्याकडे असला असता. जाणून घेऊया जगातला सर्वात मोठा ड्रग डिलर पाब्लोबद्दल...
जानेवारी महिन्यात एक बातमी आली होती की, अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआए कुप्रसिद्ध ड्रग लॉर्ड पाब्लो अॅस्कोबर याचा खजाना शोधणार आहे. ज्या ठिकाणी पाब्लोच्या करोडो रुपयांचा खजाना असलेली सबमरीन बुडाली होती, त्या जागेचा शोध सीआयएला लागला आहे.
पाब्लोचं काळं-विषारी साम्राज्य
साधारण दोन दशकांपूर्वी जगभरात ड्रग लॉर्ड पाबलो अॅस्कोबार याचं नाव चालत होतं. तो जगातला सर्वात श्रीमंत आणि भयानक ड्रग माफिया होता, ज्याचा एन्काऊंटरमध्ये खातमा करण्यात आला होता. त्याच्याबाबत दावा केला जातो की, त्याच्याकडे इतका पैसा होता की, प्रत्येकवर्षी त्याचे करोडों रुपये उंदीर खाऊन टाकायचे.
- पाब्लो एमिलियो एस्कोबार हा कोलंबियातील एक ड्रग माफिया होता. तो जगभरात हा काळा धंदा करायचा.
- पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचं पुस्तक 'द अकाऊंट स्टोरी' नुसार, तो एका दिवशी जवळपास 15 टन कोकीनची तस्करी करत होता.
(Image Credit: Mandatory)
- 1989 फोर्ब्स मॅगझिनने एस्कोबारला जगातला 7 वा सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. त्याची खाजगी संपत्ती अंदाजे 30 बिलियन डॉलर म्हणजेच 16 खरब रुपये इतकी होती. त्याच्याकडे अनेक आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्या होत्या.
उंदीरांनी कुरतडल्या करोडोंच्या नोटा
पाब्लोचा भाऊ रॉबर्टो याने पुस्तकात लिहिले की, त्यावेळी पाब्लोचं वार्षिक उत्पन्न 126988 कोटी रुपये इतकं होतं. त्यावेळी गोदामात ठेवलेल्या या पैशांचा 10 टक्के भाग उंदरांनी खाल्ला होता. त्यासोबतच काही रक्कम पाणी आणि इतर गोष्टींमुळेही खराब व्हायची. रॉबर्टोनुसार, पाब्लो प्रत्येक महिन्यात नोटांचे बंडल बांधण्यासाठी एक लाख 67 हजार रुपये केवळ रबरवर खर्च करायचा. 1986 मध्ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने देशाचं 10 बिलियन डॉलर(5.4 खरब रुपये) कर्ज चुकवण्याचीही ऑफर दिली होती.
गरीबांचा मसीहा
- पाब्लो कोलंबियन सरकार आणि अमेरिका सरकारचा सर्वात मोठा शत्रू होता. पण तरीही त्याला मेडेलिनमध्ये गरीबांचा मसीहा मानलं जायचं.
- पाब्लोने अनेक चर्चची उभारणीही केली आहे. रॉबिनहूडसारखी प्रतिमा बनवण्यासाठी त्याने खूपकाही केले होते. 15 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न
- 1976 मध्ये 26 वर्षांचा असताना पाब्लोने 15 वर्षे वय असलेल्या मारिया व्हिक्टोरियासोबत लग्न केले होते. या लग्नातून त्याला दोन अपत्येही आहेत.
- पाब्लोने 5 हजार एकरात फॅलो हॅसियेंदा नॅपोलेस (नेपल्स इस्टेट) नावाचं एक आलिशान साम्राज्यच उभं केलं होते.
- त्यासोबतच त्याने एक ग्रीक शैलीच्या किल्ल्याच्या बांधकामाची योजनाही आखली होती. किल्ल्याचं बांधकामही सुरु झालं होतं. पण पूर्ण होऊ शकलं नाही.
- त्याचे शेत, प्राणी संग्रहालय आणि किल्ले सरकारने ताब्यात घेतले आहेत.
- 2 डिसेंबर 1993 मध्ये त्याचा एनकाऊंटरमध्ये खातमा करण्यात आला होता.