शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

50 अब्जांचा महाल, सोन्याचं विमान-कार; या सुल्तानाची लाइफस्टाईल वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 3:39 PM

आज आम्ही तुम्हाला एका अशाच एका सुल्तानाबाबत सांगणार आहोत जो जगातील सगळ्यात श्रीमंत मानला जातो.

जगभरातील जास्तीत जास्त देशांमध्ये लोकशाही आहे. म्हणजे जनतेने निवडून दिलेले सरकार. पण आजही काही देश आहेत जिथे राजेशाही चालते. देशाचा कारभार राजा आणि सुल्तान चालवतात. आज आम्ही तुम्हाला एका अशाच एका सुल्तानाबाबत सांगणार आहोत जो जगातील सगळ्यात श्रीमंत मानला जातो. 

या सुल्तानाचं नाव आहे ब्रुनेईचा सुल्तान हसनल बोल्कियाह. याचं पूर्ण नाव हसनल बोल्कियाह इब्नी उमर अली सैफुद्दीन तृतीय (Hassanal Bolkiah ibni Omar Ali Saifuddien III) असं आहे. त्याचं वय 77 आहे. ब्रुनेई हा देश आपल्या भरपूर तेल भांडारासाठी ओळखला जातो. तर येथील एकूण लोकसंख्या 4 लाखांच्या आसपास आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका रिपोर्टनुसार, या सुल्तानाची एकूण संपत्ती 2 लाख 88 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. डेलीस्टारनुसार, त्याच्याकडे एक प्रायव्हेट प्लेनही आहे जो सोन्याने तयार करण्यात आलंय. 3 हजार 359 कोटीच्या प्रायव्हेय जेटमध्ये 959 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू आहेत. यात सोन्याचे वॉश बेसिनही बसवण्यात आले आहेत. 

या सुल्तानाच्या कलेक्शनमध्ये फरारी, लॅम्बोर्गिनी, पोर्श, बेंटले, रॉल्स रॉयस, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, जगुआर, लैंड रोवर, ऑडी…अशा अनेक लक्झरी गाड्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्याकडे 183 लॅंड रोव्हर, 275 लॅम्बोर्गिनी, 350 पेक्षा जास्त बेंटले कार आहेत. असं म्हणतात की, या सुल्तानाकडे 7 हजार लक्झरी कार आहेत.

असंही म्हटलं जातं की, ब्रुनेईच्या या सुल्तानचा महाल जगात सगळ्यात मोठा आहे. ज्याला ‘इस्‍ताना नुरुल इमान पॅलेस’ नावाने ओळखलं जातं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याचं नाव नोंदवलं आहे. असंही सांगण्यात येतं की, 20 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या आलिशान महालात एकूण 1700 रूम्स, 257 पेक्षा जास्त बाथरूम, अनेक स्वीमिंग पूल, गाड्यांसाठी अनेक गॅरेज आहेत. या महालात अनेक ठिकाणी सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

ब्रुनेईच्या सुल्तानाने 3 लग्ने केली होती. ज्यातील हरजाह आणि अरिनाज नावाच्या राण्यांना त्याने घटस्फोट दिला होता. सुल्तानाकडे स्वत:चे प्राणी संग्रहालयही आहेत. ज्यात जवळपास 30 बंगाल टायगर आहेत. तसेच इतरही अनेक प्राणी आहेत.हसनल बोल्कियाहचा जन्म 15 जुलै 1946 मध्ये झाला होता. वडिलांचं नाव सुल्तान उमर अली सैफुद्दीन III होतं. त्याने 2017 मध्ये राजा म्हणून 50 वर्ष पूर्ण केली. तो ब्रुनेईचा 29वा सुल्तान आहे. 1984 मध्ये इंग्रज गेल्यापासून तो देशाचा पंतप्रधान म्हणूनही काम करत आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके