सहजासहजी न दिसणारे जंगली प्राणी जवळून पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग ते अशा प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी सफारी पार्कमध्ये (Safari Park) गाडीने जातात. तिथे गेल्यानंतर हे प्राणी जेव्हा आपल्या गाड्यांजवळ येतात तेव्हा ते काहीजणांना ते खूप क्युट वाटतात, पण शेवटी ते हिंस्र प्राणी. कितीही क्युट वाटले तरी कधी हल्ला करतील हे सांगणे मुश्कील आहे.अशाच एका महिलेवर सिंहाने केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला.
हे प्रकरण २०१५ सालातील असून गेम ऑफ थ्रोन्स या गेम शोची एडिटर कॅथरीन चॅपल (Katherine Chappell) यांच्याबाबतीत घडलेलं आहे. कॅथरीन साऊथ आफ्रिकेतील सफारी पार्कमध्ये (Lion Attack At Safari Park) फिरायला गेली. तिथं तिच्यावर सिंहाने भयंकर हल्ला केला. कॅथरीनच्या कारच्या मागे असलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात हे खतरनाक दृश्य कैद झालं. या व्यक्तीने आता या भयंकर घटनेचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. बेन गोवंडेर असं या पर्यटकाचं नाव आहे.
बेनने सांगितलं की, सिंह कॅथरीनच्या कारच्या खिडकीतून आत डोकावत होता. सिंहानं आपलं तोंड कारच्या खिडकिच्या आत टाकलं आणि तो तिचं तोंड चाटू लागला. चाटता चाटता सिंहाने तिच्या चेहऱ्याचे लचके तोडायला सुरुवात केली. सिंहाने जेव्हा आपलं तोंड खिडकीतून बाहेर काढलं तेव्हा त्याचं तोंड रक्ताने माखलं होतं. त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं आणि तो मांस चावत होता.
हे इतक्या अचानक झालं की काय करावं हे कुणाला समजलंच नाही. कॅथरीनसोबत त्या कारमध्ये टूरिस्ट गार्डही होती. गार्डने तिला वाचवण्यासाठी सिंहाच्या तोंडावर मुक्का मारला पण तरी सिंहाने कॅथरीनला सोडलं नाही. ही घटना प्रत्यक्षात पाहून गार्डला हार्ट अटॅकही आला. कॅथरीनला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला, असं बेनने सांगितलं.