या जगात झोप अनकांना प्रिय आहे. झोप घेतल्याने शरीराचा थकवा दूर जातो, पण अति झोप घेतल्याने माणूस आळशी बनतो. पण, सध्या काहीजण याच झोपेतून पैसे कमवत आहेत. साधारपणे नोकरी करणा किंवा विझनस करणाऱ्या व्यक्तीला दिवसातून फार कमी वेळ झोपण्यासाठी मिळतो. पण एक असा व्यक्ती आहे, जो 6-7 तास झोपून पैसे कमवत आहे.
सुपर मेनस्ट्रीम नावाचा YouTuber त्याच्या पलंगाच्या बाजूला मायक्रोफोन, कॅमेरा, लाइटिंग आणि मॉनिटर ठेवतो. त्याची झोप पाहण्यासाठी हजारो दर्शक लाइव्ह येतात आणि फक्त व्हिडिओ पाहात नाहीत, तर त्याला पैसेही देतात. लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीम केल्यानंतर हा व्यक्ती त्याचे व्हिडिओ पोस्ट करतो.
व्हिडिओ पाहणारे पैसे देतातझोपेतून पैसे कमावण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सुपर मेनस्ट्रीम चॅनलवर, व्यक्ती अनेक तास झोपतो, तर लोक गाणी वाजवून, मेसेज पाठवून आणि अॅलेक्साच्या माध्यमातून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. 21 वर्षीय युट्युबरने सांगितले की, तो आठवड्यातून एकदा सहा ते सात तास YouTube लाइव्ह करुन £2,000 (2 लाख रुपयांहून अधिक) कमावतो.
YouTube वर स्लीप स्ट्रीम खूप लोकप्रिय आहेस्लीप स्ट्रीम यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहे, अनेकजण त्याद्वारे हजारो-लाखो रुपये कमवत आहेत. झोपेतून पैसे कमवण्याचा हा मार्गही लोकांना आवडतोय. YouTube वर स्लीप स्ट्रीममध्ये स्वारस्य दाखवणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात यूट्यूबवर 170 हून अधिक व्हिडिओ आढळले. गेल्या वर्षी स्लीप स्ट्रीमचे एकूण 500 व्हिडिओ होते.