(Image Credit : New Indian Express)
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यानच्या काही चांगल्या तर काही विचित्र घटना सतत समोर येत आहेत. कुणी घरात स्वयंपाक करून वेळ घालवत आहेत तर कुणी साफसफाई करून. तर कुणी पुस्तकं वाचत बसले आहेत. अशात एका तरूणाच्या अनोख्या गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रशियाच्या मॉस्कोतील तरूण बिझनेसमन लॉकडाऊनमुळे कंटाळला आणि हा कंटाळा दूर करण्यासाठी तो डिलिव्हरी बॉय बनला.
'वॉशिग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या तरूण बिझनेसमनचं नाव Sergey Nochovnyy आहे. तर त्याचं वय आहे 38. असं अजिबातच नाही की, लॉकडाऊनमुळे त्याच्या बिझनेसचं नुकसान झालं किंवा बंद पडला. त्याने जीवनाला केवळ एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यासाठी डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला.
Nochovnyy हा डिलिव्हरी बॉय झाल्यापासून रोज साधारण 20 किमोमीटर पायी चालतो. तो फूड डिलिव्हर करतो. त्याची रोजची कमाई सुद्धा चांगली होते. रोज तो 12 डॉलर ते 20 डॉलर कमाई करतो.
Nochovnyy मूळ बिझनेस हा 2 मिलियन डॉलरचा आहे. म्हणजे इतकं त्याचं वर्षाचं टर्नओव्हर आहे. भारतीय करन्सीनुसार, ही रक्कम 15 कोटी रूपयांच्या आसपास होते. तो कन्सल्टिंगचा बिझनेस करतो.
Nochovnyy हा गेल्यावर्षीच रशियात परत आला. आधी तो चीनमध्ये राहत होता. तिथे तो 12 वर्षे राहिला. त्याने सांगितले की, लॉकडाऊनमधे तो सर्वात जास्त फिजिकल अॅक्टिविटी मिस करत होता. सोबतच त्याने हेही सांगितले की, डिलिव्हरी बॉयला कुणी नोटीस नाही करत की, तो किती मोठा बिझनेसमन आहे. लोकांना केवळ त्यांच्या पार्सलसोबत देणं-घेणं असतं.