मुंबई – देशात कोरोनाचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु ठेवलं आहे. त्यामुळे अनेक मजूर घरापासून लांब अडकले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही शिथिलता आणून देशातंर्गत विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण काही ठिकाणी फ्लाईट्स रद्द होण्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.
मुंबईतील असाच एक प्रवासी सध्या अडचणीत सापडला आहे. या मजुराला मुंबईहून कोलकाता येथे जायचं आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुराच्या उत्पन्नाचं साधन बंद पडलं आहे. घरी परतण्यासाठी काहीच साधन नसल्याने या मजुराने बचत केलेल्या पैशातून विमान तिकीट खरेदी करण्याचा निर्णय केला. त्यासाठी या मजुराला आपल्या बकऱ्याही विकायला लागल्या. एकूण ३० हजार ६०० रुपये जमा करुन मजुराने इंडिगोचं तिकीट खरेदी केले.
२८ मे रोजी ही फ्लाईट होती, मात्र काही कारणास्तव इंडिगोने ही फ्लाईट रद्द केली. आपलं सर्वस्व पणाला लावूनही मजुराच्या पदरी निराशा पडली. हा मजुर मुंबईतच अडकला आहे. मीडियासमोर हे प्रकरण येताच विमान कंपनीने या मजुराला १ जूनच्या फ्लाईटमधून मुंबईहून कोलकाताला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच यासाठी कोणतंही अतिरिक्त शुक्ल आकारलं जाणार नाही हे स्पष्ट केले आहे.
देशात देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यानंतर हवाई प्रवाशांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यासह विमानतळांवरील यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारने विमान कंपन्या सुरू करण्यास कोणतीही घाई केली नाही ना अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानात नवी दिल्लीहून लुधियानाला जाणाऱ्या एका प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली. त्यानंतर बुधवारी एअर इंडियाने एक निवेदन जारी केले की या उड्डाणातील सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
…तर भारताच्या ‘चक्रव्युहातून’ बाहेर पडणं कठीण; सीमेवरील डावपेच चीनला महागात पडणार
चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्यास लष्कराची तयारी
बोटांच्या लांबीने कळेल तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती?; वैज्ञानिकांनी सांगितलं...
कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद!