नवी दिल्ली – संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचं थैमान असल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातचं राहावं लागत आहे. कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी भारतात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे.
लॉकडाऊन असूनही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजही अनेक ठिकाणी लोकांकडून लॉकडाऊनचं पालन केलं जात नाही. अनेकांकडून सर्रासपणे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. अशात जंगलातील वन्यप्राणीही शांतता असल्यामुळे शहराकडे कूच करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे त्यात हत्तींनी आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार करताना पाहायला मिळत आहे.
जेव्हा हे हत्ती आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन भारतात येत होते त्यावेळी एक बीएसएफ जवान त्याठिकाणी उपस्थित होता. त्याने हा व्हिडीओ शूट केला. त्यात तो म्हणत आहे की, चार्ली ३९ टू कंट्रोल, मामा आ रहा है, छोटा या बडा विक्टर को अभी मत भेजना! असं व्हिडीओ सांगण्यात येत आहे.
बीएसएफने स्वत: हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, चार्ली ३९ टू कंट्रो, मामा निकल रहा है, छोटा या बडा विक्टर को अभी मत भेजना, हा व्हिडीओ गारो हिल्स, मेघालय येथील आहे. या हत्तींना मामा का म्हणतात याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. जवान हत्तींना मामा आदराने बोलतात. या व्हिडीओला आतापर्यंत ५८ हजारांहून जास्त लोकांना बघितला आहे.
हत्तींना मामा शब्द वापरल्यामुळे लोकांना तो चांगलाच पसंतीचा पडला आहे. मामासोबत प्रेम झाले, मामाला घरात सुरक्षित राहायला सांगा अशा शब्दात लोकांनी ट्विटरवर या व्हिडीओचं कौतुक केले आहे.