शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

5 वर्षाआधी जिला दिला होता घटस्फोट पुन्हा तिच्यासोबत केलं लग्न, इमोशनल आहे कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:46 AM

विनय जयस्वालची कहाणीच उलट आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 5 वर्षांनी पुन्हा तिच्याचसोबत लग्न केलं.

अनेकदा आयुष्यात अशा काही घटना घडून जातात, ज्यांबाबत पुढे जाऊन असं वाटतं की, मागे जाता आलं असतं आणि बिघडलेल्या गोष्टी जुळवता आल्या असत्या तर...असा विचार अनेकजण करतात, पण असं शक्य नसतं. कारण अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या या विचारात अडथळा ठरत असतात. 

मात्र, विनय जयस्वालची कहाणीच उलट आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 5 वर्षांनी पुन्हा तिच्याचसोबत लग्न केलं. दोघांची पुन्हा एक होण्याची कहाणी फार भावूक करणारी आहे. जी प्रेम करणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण आहे.

घटस्फोटाच्या 5 वर्षानंतर पुन्हा लग्न

विनय जयस्वालने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर त्याची कहाणी शेअर केली. त्याने लिहिलं की, 'जर-तर आणि किंतु-परंतुच्या गोष्टी मागे सोडत आम्ही एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकदा एक होण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या उपस्थितीत रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केलं. आता आम्ही एक आहोत आणि सोबत आहोत'.

या कपलचं लग्न डिसेंबर 2012 मध्ये झालं होतं. पण काही वादामुळे दोघांनीही सहमतीने 2018 मध्ये घटस्फोट घेतला. विनयने सांगितलं की, घटस्फोटाचा निर्णय आला त्या दिवशी आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सोबत डिनर केलं आणि एकमेकांना निरोप दिला. इतक्या वर्षात आमचा संवाद तुटला होता. पण हृदयाचं कनेक्शन तुटलं नव्हतं.

पुन्हा कसे झाले एक?

जेव्हा विनय जयस्वालला हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांची एक्स वाईफ त्यांच्याकडे धावत आली. तिने विनयच्या ओपन हार्ट सर्जरीनंतर आयसीयूपासून ते घरापर्यंत त्याच्या रिकव्हरी दरम्यान विनयला साथ दिली.

विनयने सांगितलं की, माझ्या हार्ट अटॅकने आम्हा दोघातील अंतर बर्फासारखं वितळवण्याचं काम केलं आणि आम्ही पुन्हा एक झालो. विनयच्या फेसबुक अकाऊंटवरून दिसतं की, तो उत्तर प्रदेशच्या प्रयागराज राहणारा आहे आणि एक पत्रकार आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट