यूनायटेड किंडममध्ये एक कपल जेम्स आणि क्लो लस्टेडची लव्हस्टोरी सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेमाबाबत असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत असता त्या व्यक्तीमध्ये तुम्ही कमतरता शोधत बसत नाही. असंच या कपलबाबत म्हणता येईल.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ३३ वर्षीय अभिनेता जेम्स लस्टेड आणि शिक्षिका असलेल्या २७ वर्षीय क्लो लस्टेडने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. दोघेही यूकेचे राहणारे आहेत. दोघेही एकाच शहरातील आहेत आणि त्यांची लव्ह स्टोरी फारच यूनिक आहे. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या रूममध्ये बॉयफ्रेन्डला दिसलं असं काही, त्यानेच झाला तिचा भांडाफोड!)
यावर्षी २ जूनला त्यांनी एक मॅरिड कपलच्या उंचीबाबत सर्वात मोठं अंतर असल्याचा रेकॉर्ड तोडला. जेम्सची उंची १०९.३ सेमी म्हणजेच ३ फूट ७ इंच आणि त्याची पत्नी क्लोची उंची १६६.१ सेमी म्हणजेच ५.४ इंच आहे. या कपलमध्ये साधारण ५६.८ सेमी म्हणजे जवळपास २ फूट उंचीचं अंतर आहे.
जेनेटिक डिसऑर्डरमुळे जेम्स बुटका आहे. डायस्ट्रोफिक डिसप्लेसियामुळे त्याची उंची वाढू शकली नाही. २०१२ मध्ये जेम्सने आपल्या होमटाउनमध्ये ऑलम्पिक मशाल नेल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी त्याची क्लोसोबत ओळख करून दिली होती. क्लोसाठी हे पहिल्या नजरेतील प्रेम होतं. क्लो ला उंच पुरूष पसंत होते. मात्र, तिचा विचार तेव्हा बदलला जेव्हा ती जेम्सला भेटली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. पण तिला जरा चिंता होती की लोक त्यांच्या रिलेशनशिपवर कसं रिअॅक्शन देतील.