नवी दिल्ली: 'नशीब बदलायला वेळ लागत नाही', ही म्हण आपण ऐकली असेलच. कोणाचे नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरसोबतही असंच काहीसं घडलं आहे. जॅकने एका पोकर टूर्नामेंटमध्ये 2.5 मिलीयन पाउंड म्हणजेच 25 कोटी रुपये जिंकले आहेत. यामुळे आता सर्वत्र जॅकची चर्चा होत आहे.
एका रिपोर्टनुसार, जॅक एक साधारण नोकरी करतो. त्याने एका पोकर स्पर्धेत भाग घेतला होता. काही मिनिटांच्या खेळात जॅक तब्बल 25 कोटी रुपयांचा मालक झाला. याबाबत जॅक म्हणाला, 'मला वाटतं मी चांगला खेळलो, माझ्यासाठी पैसे गरजेचे होते. आता माझे आयुष्य काही प्रमाणात बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया जॅकने दिली.
जॅक हा सेंट अल्बन्स हर्टफोर्डशायरचा आहे. जॅकला हा खेळ पहिल्यापासूनच आवडायचा. गेल्या पाच वर्षांत त्याने एकूण 87,000 पाउंड जिंकले होते. यामध्ये सर्वात मोठी रक्कम 20,000 पाउंड आहे. त्याच्यासोबत या पोकर गेममध्ये एकूण 6,650 खेळाडूंनी भाग घेतला होता. या गेममध्ये प्रत्येकाला समान संख्येच्या चिप्स दिल्या जातात. तो शेवटी 77,300,000 चिप्ससह गेममधून बाहेर पडला. हा गेम जिंकणाऱ्या पहिल्या खेळाडूला 6 मिलीयन पाउंडचे बक्षीस मिळाले आहे.