एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीची ऐनवेळी खूप मदत केलेली असते आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने वाट्टेल ते केल्याचं आपण ऐकत असतो. मात्र, तुम्ही कधी एखाद्या म्हशीचे उपकार फेडण्यासाठी कुणी सुट्टी मागितल्याचं ऐकलंय का? नक्कीत ऐकलं नसेल. पण आता अशी वेगळी घटना समोर आली आहे. एका कॉन्स्टेबलने चक्क म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टी मागितली आहे.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एसएएफ 9व्या बटालियनमधील कॉन्स्टेबल कुलदीप तोमर यांचं एक पत्र सोशल मीडियात व्हायरल झालंय. या कॉन्स्टेबलने चक्क त्याच्या घरी असलेल्या म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी लिहिले आहे की, त्यांनी नेहमीच या म्हशीचं दूध प्यायलंय आणि आता तिचे उपकार फेडायचे आहेत. ती आजारी आहे.
म्हशीने दिला पिल्लांला जन्म
कुलदीप तोमर यांची आई सुद्धा बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. ज्यामुळे कॉन्स्टेबल कुलदीप यांनी 10 दिवसांची सुट्टीही घेतली होती. ते परत आल्यावर त्यांचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या अर्जात लिहिले आहे की, कॉन्स्टेबलच्या आईची तब्येत ठिक नाही, ज्यासाठी त्यांना सुट्टी हवी आहे, तसेच असेही लिहिले आहे की, त्यांच्या घरात एक म्हैस आहे. या म्हशीने एका पिल्लालाही जन्म दिलाय आणि या म्हशीची सेवा करण्यासाठी त्यांना सुट्टी हवी आहे.
'मी या म्हशीचं दूध प्यायलोय'
या अर्जात कॉन्स्टेबलने लिहिले आहे की, बालपणापासूनच त्यांनी या म्हशीचं दूध प्यायलं आहे. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे उपकार त्यांना फेडायचे आहेत. मात्र, दुसरीकडे या पत्राबाबत कॉन्स्टेबलना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हा अर्ज लिहिल्याचे मान्य केले नाही. तर अधिकाऱ्यांनी या व्हायरल झालेल्या अर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
'मला म्हशीचे उपकार फेडायचेत'
या व्हायरल झालेल्या अर्जात पुढे लिहिले आहे की, मी म्हशीचं दूध पिऊनच पोलीस भरतीसाठी धावण्याची तयारी करत होतो. माझ्या जीवनात या म्हशीचं खूप महत्वपूर्ण स्थान आहे. या म्हशीमुळेच मी आज पोलिसात आहे. म्हशीने माझ्या चांगल्या आणि वाईट वेळत मला साथ दिलीये. अशात तिचे हे माझ्यावर उपकारच आहेत. अशावेळी मी म्हशीची सेवा करेन.
हा अर्ज व्हायरल झाल्यावर अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलची कानउघडणी केली आहे. पण कॉन्स्टेबलने हा अर्ज त्यांनी लिहिलाच नाही असे सांगितले आहे. त्यामुळे आता कॉन्स्टेबलच्या नावाने हा अर्ज कुणी लिहिलाय का याचा तपास सुरू आहे.
वाह रे नशीब! खाणीत काम करताना सापडली दोन किंमती अन् मोठी रत्ने, मजूर रातोरात झाला कोट्याधीश...
शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'