क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:51 AM2020-07-30T10:51:14+5:302020-07-30T11:02:32+5:30
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील योगेश केसरवानी नावाचा परिवार राहतो. या परिवाराचं संपूर्ण शहरात कौतुक केलं जातं. कारण या परिवाराच्या घरात जेवढ्या वनस्पती वाढत आहेत, तेवढ्या तर नर्सरीमध्येही नसतील. यातील सर्वात खास आहे १५० वर्ष जुनं पिंपळाचं झाड.
घर तयार करायचं म्हटलं तर कितीतरी झाडे आधी तोडावी लागतात. तेव्हा कुठे सीमेंटचं जंगल उभारलं जातं. त्यातील एका छोट्या जागेवर एक छोटं गार्डन तयार केलं जातं. पण अशाप्रकारे आपलं घर उभं करण्यासाठी निसर्गातील कितीतरी जीवांचं घर तोडलं जातं. झाड तोडणं हा तसा गुन्हा आहे, पण लोक सर्रास हा गुन्हा करताना दिसतात. पण एका व्यक्ती याबाबतीच फारच कमाल केली आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील योगेश केसरवानी नावाचा परिवार राहतो. या परिवाराचं संपूर्ण शहरात कौतुक केलं जातं. कारण या परिवाराच्या घरात जेवढ्या वनस्पती वाढत आहेत, तेवढ्या तर नर्सरीमध्येही नसतील. यातील सर्वात खास आहे १५० वर्ष जुनं पिंपळाचं झाड.
हे घर १९९४ मध्ये योगेशच्या वडिलांनी हे घर बांधलं होतं. जेव्हा ही जमीन खरेदी केली तेव्हा त्यावर एक पिंपळाचं झाड होतं. इंजिनिअर म्हणाला होता की, झाड तोडाल तर घर बनवायला बरीच मोठी जागा मिळेल. पण योगेशच्या वडिलांनी झाड तोडण्यास नकार दिली. पिंपळाच्या झाडामुळे घर उभारण्यात अडचण येत होती. त्यानंतर त्यांना एक असा इंजिनिअर भेटला जो झाड न तोडता घर बांधून द्यायला तयार झाला.
साधारण एक वर्षाच्या नेहनतीनंतर दोन मजली घर बांधून तयार झालं. पण घराच्या आजूबाजूला गार्डन होऊ शकलं नाही. पण याची कमतरता अजिबात भासली नाही. कारण त्यांच्या घरातच कितीतरी प्रकारची झाडे होती. तसेच १०० पेक्षा जास्त वर्ष जुनं पिंपळाचं झाडही त्यांच्या घरात होतं.
योगेशने सांगितले की, जेव्हा घर तयार करण्यात आलं तेव्हा अनेकांनी डिझाइन बघून आमची खिल्ली उडवली. पण असं घर फक्त आमच्याकडेच असणार होतं. त्यामुळे आम्हाला काही फरक पडला नाही. योगेश म्हणाले की, दहा पूत्रांच्या बरोबर एका झाडाचं महत्व असतं. एक झाड सामाजिक जीवनात पर्यावरणाला निरोगी ठेवतं.
घर तयार केल्यावर काही वर्षांनी पिंपळाच्या झाडाच्या काही फांद्या खिडक्यांमधून बाहेर येऊ लागल्या. बघणाऱ्यांसाठी ही अनोखी बाब होती. योगेश सांगतात की, त्यांची आई या झाडाची रोज पूजा करत होती. आता त्यांची पत्नी रोज पूजा करते. लहान मुले याच झाडाच्या फांद्यांवर खेळत मोठे होत आहेत.
या घराचं डिझाइन फारच अनोखं तयार करण्यात आलं आहे. झाडाची एकही फांदी घरात अडचणीचं कारण ठरत नाही. प्रत्येक फांदीला बाहेर निघण्याची संधी दिली जाते. त्यासाठी तशा खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. इतकेच काय तर झाडाच्या उंचीत काही अडचण होऊ नये म्हणून छतावरही खास जागा तयार केली आहे.
म्हणजे केसरवानी परिवाराने त्यांच्या घरासाठी झाडाची एक फांदीही तोडली नाही. तर झाडाला सुरक्षित ठेवण्यासाठी झाडाच्या आजूबाजूला घर तयार केलं. घरात पिंपळ आणि इतर झाडांमुळे वातावरण शुद्ध आहे. अनेक खाजगी आणि सरकारी इंजिनिअर या घराचा अभ्यास करण्यासाठी येतात. खरंच प्रत्येकाने जर असा चांगला विचार केला तर झाडांची कत्तलही होणार नाही आणि प्रत्येकाकडे एक अनोखं घरही असेल. पर्यावरणाचं रक्षणही होईल.
हे पण वाचा :
लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग
OMG! झाडावर असा काही कुंडली मारत चढला साप की, बघणाऱ्यांना फुटला घाम!