VIDEO: 'साहेब, म्हैस दूध देत नाही, मदत करा...!' म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 05:23 PM2021-11-14T17:23:53+5:302021-11-14T17:24:35+5:30
यासंदर्भात, शनिवारी नायगाव येथे पोलिसांना मदत मागणाऱ्या या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हैस दूध देत नाही, म्हणून तिला घेऊन थेट पोलीस ठाणेच गाठले आणि काही दिवसांपासून माझी म्हैस दूध देत नी मला मदत करा, तक्रार केली. यानंतर, पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याला म्हशीचे दूध काढण्यास मदत केली. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.
यासंदर्भात, शनिवारी नायगाव येथे पोलिसांना मदत मागणाऱ्या या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पोलीस उपाधीक्षक अरविंद शाह यांनी सांगितले की, बाबुलाल जाटव (४५) नावाच्या एका व्यक्तीने शनिवारी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात, गेल्या काही दिवसांपासून त्यांची म्हैस दूध देत नाही, असे सांगण्यात आले होते. यानंतर, सुमारे चार तासांनंतर तो थेट आपल्या म्हशीला घेऊनच पोलीस ठाण्यात आला आणि त्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी पोलिसांची मदत मागितली.
यानंतर, पोलिसांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून, शेतकऱ्याला काही टिप्स सांगितल्या. यानंतर, संबंधित शेतकऱ्याने दूध काढण्याचा प्रयत्न केला असता म्हशीने दूध काढू दिले. यानंतर पोलिसांचे आभार मानण्यासाठी तो शेतकरी पुन्हा सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात आला होता आणि त्याने रविवारी सकाळी म्हशीने दूध दिल्याचे सांगितले.
VIDEO: 'साहेब, म्हैस दूध देत नाही, मदत करा...!' म्हशीला घेऊन शेतकरी पोहोचला पोलीस ठाण्यात अन्...#Buffalo#FArmersbuffalopic.twitter.com/HjLXZ30ERO
— Lokmat (@lokmat) November 14, 2021
यासंदर्भात, अरविंद शाह म्हणाले, तक्रारदार हा विक्षिप्त नव्हता. पण तो खूप भोळा होता. त्याने नुकतीच म्हैस घेतली. पण ती दूध देत नसल्याने गावातील कुणीतरी त्याला पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो येथे आला होता.