VIDEO : रक्ताने माखलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवण्यासाठी घरातून धावत गेली तरूणी आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 05:18 PM2022-03-12T17:18:20+5:302022-03-12T17:18:30+5:30
Madhya Pradesh Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन दिवसाआधीची आहे. रात्री साधारण ११ वाजता १४ क्वार्टरचा राहणारा प्रफुल्ल कश्यप मोठ्या पुलावर बसला होता.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दमोहमध्ये शुक्रवारी रात्री एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी जे केलं त्याची चर्चा जोरात रंगली आहे. जखमी बॉयफ्रेन्डला वाचवण्यासाठी गर्लफ्रेन्ड कुटुंबियांना न सांगता अर्ध्या रात्र घराबाहेर पळाली. ती बॉयफ्रेन्ड नुसती गेलीच नाही तर त्याच्या शरीरावर लागलेला चाकू काढला आणि त्याच्या जखमांवर पट्ट्या बांधल्या. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिथे त्याला बिलगून रडू लागली.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन दिवसाआधीची आहे. रात्री साधारण ११ वाजता १४ क्वार्टरचा राहणारा प्रफुल्ल कश्यप मोठ्या पुलावर बसला होता. तेव्हाच साधारण २० लोक त्याच्याजवळ आले आणि त्याच्यासोबत वाद घालू लागले होते. या लोकांमध्ये एक तरूणीही होती. या तरूणीचं नाव मनीषा सांगितलं जात आहे. हे सगळे लोक प्रफुल्लसोबत बोलता बोलता भडकले आणि त्याला मारहाण करू लागले होते. यानंतर एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चाकू त्याच्या मांडीवर लागला. प्रफुल्ल कसातरी तिथून पळाला आणि त्याने गर्लफ्रेन्ड राजियाला फोन करून याची माहिती दिली.
युवक पर जानलेवा हमला pic.twitter.com/B7hnVh9MZG
— Dharmesh pandey Damoh (@PandeyDamoh) March 12, 2022
घटनेची माहिती मिळताच राजियाला धक्का बसला. ती घरात काम करत होती. ते सगळं सोडून ती प्रफुल्लकडे गेली आणि सर्वातआधी त्याला लागलेला चाकू काढला. नंतर ओढणी फाडून जखमांवर पट्ट्या बांधल्या. नंतर ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि त्याच्यावर उपचार केले. यावेळी बॉयफ्रेन्ड बिलगून ती रडत होती.
कुटुंबियांना न सांगता ती घरातून गेल्याने नंतर आईने तिला फोन करून विचारलं की, अचानक धावत कुठे गेली. यावर ती म्हणाली की, तिच्या मित्राला कुणीतरी चाकू मारला. ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे. हे ऐकल्यावर आईही हॉस्पिटलमध्ये आली. राजियाने कशाचीही पर्वा न करता प्रफुल्लसोबत हॉस्पिटलमध्ये होती. यावेळी राजियाने आरोप लावला की, प्रफुल्लवर हल्ला त्याचीच मैत्रीण मनीषाने करवला. त्याने सांगितलं की, अमीषासोबत काही गोष्टीवरून दाव झाला होता. त्यानंतर त्याच्यावर वार करण्यात आला.