फिरता फिरता एका व्यक्तीचं चमकलं नशीब, तलावाजवळ सापडला लाखोंचा हिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:07 PM2022-10-13T12:07:42+5:302022-10-13T12:09:38+5:30

एका व्यक्तीला कमलाबाई तलावाजवळ फिरताना साधारण 20 लाख रूपये किंमतीचा हिरा सापडला. तेच दुसऱ्या एका व्यक्तीला हिरापूर टपरियनच्या खाणीत किंमती डायमंड सापडला.

Madhya Pradesh : Panna two persons found priceless diamonds | फिरता फिरता एका व्यक्तीचं चमकलं नशीब, तलावाजवळ सापडला लाखोंचा हिरा

फिरता फिरता एका व्यक्तीचं चमकलं नशीब, तलावाजवळ सापडला लाखोंचा हिरा

googlenewsNext

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील उथली हिरा खाणीतून सतत काहीना काही घटना समोर येत आहेत. आज हिरे कार्यालयात दोन चमकदार हिरे पोहोचले. एका व्यक्तीला कमलाबाई तलावाजवळ फिरताना साधारण 20 लाख रूपये किंमतीचा हिरा सापडला. तेच दुसऱ्या एका व्यक्तीला हिरापूर टपरियनच्या खाणीत किंमती डायमंड सापडला.

सगळ्यात आधी छतरपूर जिल्ह्यातील वृदांवन रायकवारचं नशीब चमकलं. त्यांचे पन्ना जिल्ह्यात नातेवाईक आहेत. ते पौर्णिमेच्या दिवशी इथे फिरायला आले होते. जेव्हा ते कमलाबाई तलावाजवळ फिरत होते. तेव्हा त्यांची नजर चमकदार हिऱ्यावर पडली. तो त्यांनी उचलला आणि हिरे कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी तो जमा केला. मूल्यांकन केल्यावर समजलं की, हिरा 4.86 कॅरेटचा आहे. हिरा जेम्स क्वालिटीचा आहे. ज्याची किंमत साधारण 20 लाख रूपयांच्या आसपास आहे. 

तेच दुसरा हिरा छतरपूर इथे राहणारा मजूर दस्सू कोंदर याला सापडला. तो गेल्या काही दिवसांपासून हिरापूर टपरियनमध्ये खाण खोदून हिरा शोधत होता. त्यानेही हिरा कार्यालयात जमा केला. ज्याचं वजन 3.40 कॅरेट होतं. 

हिऱ्याचे जाणकार अनुपम सिंह यांनी सांगितलं की, हे दोन्ही हिरे लिलावासाठी ठेवले जातील. तेच तलावाजवळ सापडलेला हिरा जेम्स क्वालिटीचा आहे. तेच खाणीत मिळालेला हिरा 3.40 कॅरेटचा आहे.
 

Web Title: Madhya Pradesh : Panna two persons found priceless diamonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.