नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) किंमती दररोज वेगाने वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातील बर्याच राज्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत शंभर पार केली आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक आता सार्वजनिक वाहतुकीचा (Public transport) प्रवास करणे चांगले समजत आहेत. कार,दुचाकी आणि स्कूटर चालविणे लोकांसाठी तोट्याचा सौदा बनत चालला आहे. (college student in tamil nadu madurai designs solar powered electric cycle pictures viral on social media)
दरम्यान, तामिळनाडूमधील मदुराई कॉलेजमध्ये शिकणार्या धनुष कुमार या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक सायकलचा शोध लावला आहे. ही सायकलची सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच, ही सायकल सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
लोकांसाठी फायदेशीरवृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, धनुष कुमार यांनी सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल शोधून काढली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 50 किमी धावण्याची क्षमता आहे. याचबरोबर, सायकलला इलेक्ट्रिक चार्ज डाऊनलाईन कमी झाल्यावरही सायकल 20 किमी आरामात चालवता येते. या सायकलमध्ये वापरल्या जाणार्या बॅटरीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि लोक त्यांच्या सोयीनुसार ती सहज वापरु शकतात.
काय आहे इलेक्ट्रिक सायकलची खासियत?या इलेक्ट्रिक सायकलने 50 किमीपर्यंत प्रवास करण्यासाठी 1.50 रुपये खर्च येतो. ही इलेक्ट्रिक सायकल 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 12 व्होल्टच्या 4 बॅटरी आहेत, 350 वॅटची ब्रश मोटर आहे, वेग वाढविण्यासाठी एक्सीलेटर बसविण्यात आला आहे. सोशल मीडियावर, मदुराई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धनुष कुमारच्या या सायकलचे जोरदार कौतुक केले जात आहे.