मॅगी ही लहानांसह मोठ्यांना सुद्दा खायला आवडते. काहीजण मॅगीच्या मागेइतके वेडे असतात की त्यांना कोणत्याही वेळी मॅगी दिली तरी ते खातील. तसंच झटपट होत असल्यामुळे मॅगी करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे अनेकजण खातात. तसंच काहीजण कुठे बाहेर फिरायला गेले असतील तसचं हॉटेलमध्ये जेवायायला गेले असतीस तरी सुद्दा त्यांना मॅगीच खायची असते. पण आत्तापर्यंत तुम्ही फक्त खाण्यासाठी मॅगीचा वापर केला जातो असं ऐकलं असेल पण तुम्ही हे ऐकलयं का की एक फॅशन म्हणून वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया मॅगीचा फॅशन म्हणून कसा हटके वापर केला आहे.
इटलीमधील एका मोठ्या ब्रँण्डने Bottega Veneta यांनी असे बूट तयार केले आहेत. ज्यामध्ये प्रतिकात्मक नूडल्सचा वापर करण्यात आला आहे. आणि नुडल्स लव्हरर्सनी या बूटांना पसंती दर्शवली आहे. पण नकळतपणे या नुडल्स मॅगी सारख्या दिसत आहेत. या प्रकारच्या शुजचे फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.
या ब्रँण्डच्या Pre-Fall 2020 कलेक्शन मध्ये एका इंन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या बूटांमध्ये आणि मॅगीच्या नूडल्समध्ये खूप साम्य आहे. हे शूज हाय हिल्सचे आहेत. या शूजवर नूडल्स चिकटवल्यासारख वाटत आहे. या मॅगीच्या शूजची किंमत तब्बल १ लाख रुपये आहे. सोशल मिडियावर या बूटांची पोस्ट पाहून अनेक कमेंट्स येत आहेत.