४० वर्षे पंजाबवर शासन करणारे वीर महाराजा रणजीत सिंह यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं आहे. रणजीत सिंह जेवढे चांगले शासक होते तेवढचे हुशार सेनापतीही होते. रणजीत सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्याही. त्यांनी तयार केलेली खालसा सेनेला इंग्रजही भारतातील सर्वश्रेष्ठ सेना मानत होते. रणजीत सिंह यांनी पंजाबला सशक्त तर केलंच, सोबतच इंग्रजांना आपल्या साम्राज्याच्या आसपासही येऊ दिलं नाही.
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे इतके शक्तीशाली शासक असून एकदा महाराजा रणजीत सिंह यांना १०० फटके मारण्याची शिक्षा सुनावली गेली होती. इतकंच नाही तर रणजीत सिंह फटके खाण्यासाठी तयारही झाले होते. पण रणजीत सिंह यांनी अशी काय चूक केली होती की, त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. चला जाणून घेऊन.
एका मुस्लिम नर्तकीवर प्रेम
रणजीत सिंह यांनी एकू २० लग्ने केली होती. त्यासोबतच त्यांच्या हरममध्ये २३ इतर महिलाही होत्या. पण असं म्हणतात की, लाहोरचे शासक बनल्यावर रणजीत सिंह एका १३ वर्षीय मुस्लीम नर्तकी मोहरानच्या प्रेमात पडले होते. महाराजा रणजीत सिंह नेहमीच अमृतसर ते लाहौर दरम्यान प्रवास करत होते. इथे त्यांनी त्यांच्यासाठी एक महालही बनवला होता. ज्याला बारादरी नावाने ओळखलं जातं. महाराजा नेहमीच बारादरीमध्ये थांबत होते आणि आवडती नर्तकी मोहरानला बोलवत होते. ती जवळच्या माखनपुरा गावात राहत होती. (हे पण वाचा : अत्याचाराबाबत वरचढ होता किम जोंग उनचा पिता, सिनेमाच्या प्रेमात अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप)
असंच एकदा महाराजांनी मोहरानला बारादरीवर बोलवलं होतं. त्यावेळी रस्त्यात एक नदी लागली. ज्यावर पुलही बांधला नव्हता. अशात घोड्यावर बसलेल्या मोहरानची एक चांदीची चप्पल नदीत पडली. मोहरानला ही चप्पल महाराजांनी गिफ्ट केली होती. मोहरान महाराजांसमोर विना चप्पल पोहोचली आणि म्हणाली की, जोपर्यंत नदीवर पूल होत नाही तोपर्यंत ती नृत्य करणार नाही. महाराजा रणजीत सिंह यांनी लगेच पूल बांधण्याचा आदेश दिला. रणजीत सिंह तिच्या इतके प्रेमात पडले होते की, त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्याही निर्णय घेतला होता.
मोहरानच्या वडिलांनी ठेवली अजब अट
रणजीत सिंह तर मोहरानच्या प्रेमात पडले होते. त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मोहरानच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. अशात त्यांनी एक अजब अट रणजीत सिंह यांच्यासमोर ठेवली. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या परिवारात एक प्रथा आहे की, जो व्यक्ती सासऱ्याच्या घरी येऊन चूल पेटवतो त्यालाच जावई म्हणून स्वीकारलं जातं. मोहरानच्या वडिलांना वाटलं की, एक महाराजा असं का करेल. पण रणजीत सिंह यांनी मोहरानला मिळवण्यासाठी ती अटही मान्य केली. (हे पण वाचा : अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे?)
नाराज झाले होते शिख
रणजीत सिंह यांना मोहरान तर मिळाली, पण या घटनेमुळे रूढीवादी शिख नाराज झाले होते. इतकंच नाही तर त्यांना अकाल तख्तसमोर हजर राहण्याचा आदेशही दिला होता. रणजीत सिंह अकाल तख्त समोर आपली चूक मान्य केली. त्यांनी सर्वांची माफी मागितली. पण तरीही त्यांना माफ केलं गेलं नाही. अकाल तख्तने महाराजा रणजीत सिंह यांना १०० फटके मारण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर राजांना कपडे काढून एका झाडाखाली बांधण्यात आलं.
राजाच्या विन्रमतेने लोकांची मने जिंकली
रणजीत सिंह राजा होते. त्यांनी ही शिक्षा मान्य करण्यास नकारही दिला असता. पण त्यांनी स्वत:ची चूक मान्य करत शिक्षेला विरोध केला नाही. तिथे उपस्थित जे लोक ही घटना बघत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या आवडत्या महाराजाला अशी शिक्षा मिळावी अशी कुणाचीही इच्छा नव्हती.
अशात त्यांना १०० फटके मारण्याची शिक्षा दिली जाणार होती. अकाल तख्तचे फूला सिंह पुढे येऊन त्यांनी ही शिक्षा थांबवली. ते म्हणाले की, महाराजा रणजीत सिंह यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी अकाल तख्तचा आदेशही मानला. महाराजा असूनही त्यांचं असं करणं कौतुकास्पद आहे. ते महाराजा आहेत. याचा आपण सन्मान करावा. त्यांना १०० ऐवजी केवळ एक फटका मारला जावा.
मोहरान आणि रणजीत सिंह यांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा झाली होती. रणजीत सिंह यांनी मोहरानच्या नावाने एक मशीदही बनवली होती. त्या मशिदीला मस्जिद-ए-मोहरान असं नाव देण्यात आलं होतं. इतकंच नाही तर १८११ मध्ये त्यांनी मोहरानच्या नावावर नाणीही काढली होती.