लखनौ - उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा जागेवर ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मुलायमसिंह यादव यांचं संपूर्ण कुटुंब एकवटलेलं दिसून येत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव एकत्र निवडणूक रॅली घेत आहेत. त्याचबरोबर औरैया जिल्ह्यातही सपा समर्थकांमध्ये नेताजींची क्रेझ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सपा समर्थक त्याच्या अंगावर 'I Love U Dimpal Bhabhi' लिहून सायकलवरून ७०० किलोमीटरचा प्रवास करत आहे.
या जागेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने रघुराज शाक्य थेट सपाशी लढणार आहेत. औरैया ते मैनपुरीपर्यंतचे समर्थक सपाला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासोबतच पक्षाचे मोठ्या नेत्यांपासून ते बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. शिवपाल सिंह यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.
डिंपलच्या समर्थनार्थ 700 किलोमीटर सायकल प्रवाससमाजवादी पक्षाच्या समर्थनार्थ असा एक समर्थक पुढे आला आहे, जो कुशीनगर ते मैनपुरी असा सायकलने प्रवास करत आहे. एवढेच नाही तर जोपर्यंत उत्तर प्रदेशात सपाचे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सायकलने जनयात्रा काढतच राहणार असा पवित्राही त्याने घेतला आहे. त्याने सांगितले की, ते कुशीनगर ते मैनपुरी सायकलवरून जात आहेत, कारण नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमुळे त्यांची सून डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी मी सायकलवरून ७०० किलोमीटरचा प्रवास करत आहे.
१४ नोव्हेंबरपासून यात्रा सुरूकुशीनगरचा रहिवासी कन्हैया निषाद १४ नोव्हेंबरपासून समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांना पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून यात्रा करत आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यांतून तो औरैया जिल्ह्यात पोहोचला आहे. येत्या दोन दिवसांत मैनपुरीला पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले. जिथे ते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. यासोबतच सपा समर्थक कन्हैया निषाद हा राष्ट्रीय महामार्गावर लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू होता, राष्ट्रीय महामार्गावर त्याला भेटलेल्या लोकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले.