शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Makar sankranti 2018 : बॉलिवूडने 'या' गाण्यांसोबत साजरी केली मकरसंक्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 8:59 AM

बॉलिवूडच्या या गाण्यांमध्ये चित्रीत केली आहे मकरसंक्रांती आणि पतंगबाजीची धुम. गोडव्याचा हा सण अनुभवा बॉलिवूडसोबत.

ठळक मुद्देनविन वर्षातला हिंदुंचा पहिला सण आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पतंग उडवणे हा आहे मकरसंक्राती आणि बॉलिवूडचा अविभाज्य घटक. बॉलिवूडच्या या गाण्यांमध्ये चित्रीत केली आहे मकरसंक्रांती आणि पतंगबाजीची धुम.

मुंबई : नविन वर्षातला हिंदुंचा पहिला सण आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठा गुळ, तीळ आणि पतंगांनी भरल्या आहेत. पतंग उडवणे हा मकरसंक्रातीचा अविभाज्य घटक. मुंबईसह महाराष्ट्र-गुजरातमध्ये यादिवशी लोक भरपुर प्रमाणात पतंग उडवतात. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालकही आपल्या घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवतात. अनेक मैदानांत पतंग महोत्सव आयोजित केले जातात. गुजरातचा ‘उत्तरायण’ हा पतंग महोत्सव तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. या फार पुर्वीपासूनच्या प्रथेला बॉलिवूडही साक्षीदार आहे. त्यांनीसुध्दा बऱ्याचदा हे पतंग उडवणं साजरं केलंय आपल्या चित्रपटांतून आणि आपल्या गाण्यांमधून. गोडव्याचा आणि पतंगांचा हा उत्सव आपल्या लाडक्या हिरो - हिरोईनींनी आणि दिग्दर्शकांनी फार सुंदररित्या साजरा केलाय. आज यानिमित्ताने पाहुयात बॉलिवूडची अशीच काही गाणी ज्यांच्यासोबत आपल्याला मकरसंक्रांत साजरी करताना येईल आणखी जास्त मज्जा.

१) उडी उडी जाये - रईस

तुमच्या यावर्षीच्या मकरसंक्रांतीच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं सगळ्यात पहिलं असायला हवं. २०१७ मध्ये आलेल्या शाहरुखच्या रईस चित्रपटातील उडी उडी जाये हे गाणं सध्याचं सर्वात ताजं मकरसंक्रांतीचं गाणं आहे. खास मकरसंक्रांतीसाठी हे गाणं लाँच करण्यात आलं होतं. या गाण्यात शाहरुख आणि माहिरा कसे भेटतात आणि त्यांच्यात प्रेम बहरतं हे दाखवण्यात आलंय.

२) मांझा - काय पो चे

काय पो चे या नावातच सगळं काही आहे. पतंग उडवताना दुसऱ्याचा पतंग काटल्यानंतर विजय साजरा करताना गुजरातीमध्ये काय पो चे असं म्हटलं जातं. आपल्या आयुष्यातही दुसऱ्याची पतंग कापून आपलं भलं केल्यानंतर आपण कसा असुरी आनंद साजरा करतो हे सांगण्यात आलंय. चित्रपटात सुशांतसिंग राजपुत आणि राजकुमार राव यांच्या भूमिका आहेत. आयुष्यात येणाऱ्या वाईट अनुभवांवर मात करत कसं यश मिळवायचं हेच या गाण्यात गीतकाराने लिहीलं आहे.

३) रुत आ गयी रे - अर्थ

आमीर खान या गाण्यात अभिनेत्री नंदिता दासला पतंग उडवणं शिकवतो. या सगळ्या प्रक्रियेत खुप रोमान्स भरलेला असतो. सुखविंदर सिंगने गायलेल्या या गाण्यात दंग व्हायला होतं.

४) ढील दे - हम दिल दे चुके सनम

जेव्हा जेव्हा हे गाणं कानावर पडतं तेव्हा तेव्हा आपल्यासमोर पतंग उडवणारे ते सगळे उभे राहतात. हे गाणं गुजराती कुटूंबावर चित्रीत ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाची ओळख आहे. पतंग उडविताना दोन गटांत लागणाऱ्या चुरशीची मजा या गाण्यात गीतकाराने करुन दिली आहे. या गाण्यात कौटुंबिक मजेसह सलमान-ऐश्वर्याचा रोमान्सही पाहायला मिळतो.

आम्ही आशा करतो की ही मकरसंक्रांती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. सोबतच गुळाचा गोडवा आणि तिळाला पकडून ठेवण्याची गुळाची वृत्ती तुमच्याही अंगी येवो, अशा सदिच्छा. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८bollywoodबॉलीवूडIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण