- प्रभू पुजारी
सोलापूर, दि. 22 - रेल्वेने प्रवास करीत असाल अन् तोही दूरवरचा तर स्वच्छ पिण्याचे पाणी़. उत्कृष्ठ, ताजे अन् गरमागरम जेवण मिळणे कठीण तेही मोफत़ आपणाला रेल्वेच्या प्रवासादरम्यान कडकडून भूक लागली असेल तर फोन अन् मेसेज करा. मी रेल्वेने प्रवास करीत आहे. बोगी नंबऱ़़ असा आहे. केवळ एवढेच कळवा आणि मनसोक्त जेवणाचा आस्वाद घ्या़ अहो ! पण कोण देते अशी मोफत जेवणाची सेवा त्यांचे नाव आहे सोलापुरातील पूनम मित्र मंडळ.पूनम मित्र मंडळाचे ३२ सदस्य आहेत. हे मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबविते़ त्याचाच एक भाग म्हणून भोजन सेवा सुरू केली तेही आगळ्या वेगळ्या प्रकारे़ देशभरातील जैन श्रावक रेल्वेनेच जास्त प्रवास करतात़ त्यांना प्रवासादरम्यान जैन पद्धतीचे जेवण मिळणे कठीण असते. त्यामुळे आपण अशा श्रावकांच्या भोजनाची सोय केली तऱ़़ हा विचार सर्व सदस्यांना चांगला वाटला़ शिवाय सर्व सदस्यांनी त्वरित या योजनेला मान्यताही दिली अन् पहिला जेवणाचा डबा गेला तो ३० डिसेंबर २०१० साली़ रेल्वेतून प्रवास करणाऱ्या जैन श्रावकांना सोलापुरातील पूनम मित्र मंडळ मोफत जेवण देते, हे माहीत व्हावे म्हणून मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, मद्रास, अहमदनगर, राजस्थान, अहमदाबाद, पुणे आदी शहरातील जैन मंदिर परिसरात याबाबतची माहिती व फोन नंबर असलेले डिजिटल फलक लावण्यात आले आहे. शिवाय अडीच लाख समाजबांधवांना एसएमएस, व्हॉटस्अॅपद्वारे कळविण्यात आले़ तसेच बेंगलोर या एकाच शहरात १३ हजार कार्डचे वाटप करण्यात आले आहेत.अशी सूचली कल्पना...पूनम मित्र मंडळाचे ३२ सदस्य दर पौर्णिमेला बार्शी येथील पार्श्वनाथ भगवान महाराजांच्या दर्शनासाठी जातात़ एका पौर्णिमेला जात असताना रेल्वे प्रवास करणाऱ्या जैन श्रावकांच्या भोजनाची सोय केली तऱ़़ अचानक ही कल्पना जितेंद्र आकराणी यांना सूचली आणि त्यांना ती सर्वांना बोलून दाखविली़ ती सर्व सदस्यांना चांगली वाटली अन् सुरू झाला हा पूनम मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम़ अनोखळी व्यक्तीची सेवा...जैन श्रावकांना जेवणाचा डबा कसे पोहोच करता तो श्रावक अनोळखी असतो? असे विचारले असता जितेंद्र आकराणी म्हणाले, जो कोणी अनोळखी जैन श्रावक असेल तो प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान आम्हा ३२ सदस्यांपैकी एकाला फोन अथवा मेसेज करतो़ तो कोणत्या रेल्वेने प्रवास करीत आहे, कोणत्या बोगीत आहे याची माहिती कळवितो़ त्याप्रमाणे कोणती रेल्वे सोलापूर स्थानकावर किती वाजता येते याची आम्हाला माहिती आहे़ त्यानुसार ठरल्याप्रमाणे आमचा एक सदस्य गरम जेवणाचा डबा घेऊन त्या बोगीसमोर उभा राहातो़ संबंधित श्रावक त्या बोगीच्या दरवाज्यात येताच आमचा ह्यपूनम मित्र मंडळ ओळखपत्र असलेल्या सदस्याकडून तो श्रावक डबा घेतो़ या सेवेबद्दल धन्यवाद देतो़असा असतो जेवणातील मेनू...पूनम मित्र मंडळाचे सदस्य असलेले दिलीप ओस्वाल यांच्याकडेच जैन पद्धतीचे जेवण तयार करण्याचे काम सोपविले आहे़ या जेवणात परोटा, दोन भाज्या, भात, एक पापड असा मेनू असतो़ सोबत पाण्याची बाटली, ग्लास, वाटी, चमचा, चहा किंवा दूध असते़ शिवाय कोणी आजारी असेल त्यांनी औषध सांगितले तर त्या श्रावकांनी सांगितल्याप्रमाणे मेडिकलमधून औषध, गोळ्या घेऊन तेही मोफत देतो़ ही सेवा केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच आहे़ तसेच तपस्वी लोकांसाठी जो कोणी आयंबिल, एकासणा, बियासणा करतात त्यांच्यासाठीही गरम पाण्याची सोय केली जाते, असे पूनम मित्र मंडळाचे प्रेसिडेंट हितेश कांकरिया यांनी सांगितले.