Weird Divorce : आजकाल लग्न मोडण्याची छोटी छोटी आणि विचित्र कारणं समोर येत असतात. घटस्फोटाचं असंच विचित्र कारण समोर आलं आहे. सतत मॅगी खाऊ घालते म्हणून एका पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याची बातमी समोर आली आहे. झालं असं होतं की, या व्यक्तीच्या पत्नीला मॅगी नूडल्सशिवाय दुसरं काही बनवता येतंच नव्हतं.
'टाइम्स नाउ'मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार म्हैसूरच्या सत्र न्यायालयात एमएल रघुनाथ यांनी एक घटस्फोटाची आठवण काढत सांगितलं की, जेव्हा ते बल्लारी जिल्हा न्यायाधीश होते तेव्हा त्यांच्याकडे एक अजब केस आली होती. एक व्यक्ती त्याची पत्नी केवळ मॅगी बनवते म्हणून तो वैतागला होता.
पतीची तक्रार होती की, त्याच्या पत्नीला मॅगीशिवाय दुसरं काहीही बनवता येत नाही. पतीने सेशन कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितलं की, पत्नी ब्रेकफास्ट, लंच आणि डीनर तिनही वेळी केवळ मॅगी बनवते. न्यायाधीश रघुनाथ या केस मॅगी केस नाव दिलं आहे. दोघांचाही घटस्फोट दोघांच्या सहमतीने झाला. न्यायाधीशांनी सांगितलं की, काही लोक लग्नाच्या एक दिवसानंतरच घटस्फोट घेण्यासाठी उतावळे होतात.
सेशन कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितलं की लोक फार छोट्या छोट्या कारणांवरून लग्नाचं नात संपवतात. ते म्हणाले की, कोणत्याही कपलने त्यांच्या लग्नाला कमीत कमी एक वर्ष तरी वेळ द्यावा. गेल्या काही वर्षात छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट घेण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे.