मलेशियात एका 22 वर्षीय तरूणाने 26 वर्षाने मोठ्या शिक्षिकेसोबत लग्न करून हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, प्रेम आंधळं असतं. लोकांचं मत आहे की, प्रेमात जात, धर्म, वय काहीच बघितलं जात नाही. केवळ प्रेम बघितलं जातं. मलेशियातील या तरूणाची आणि त्याच्या पत्नीची कहाणी वाचून तुम्ही खरंच म्हणाला की, प्रेम इतकंही आंधळं असावं?
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 2016 मध्ये मलेशियाचा राहणारा मुहम्मद डानियाल अहमद अली (Muhammad Danial Ahmad Ali) जेव्हा ज्युनिअर हायस्कूल (सातवी, आठवी, नववी) मध्ये होता तेव्हा त्याला जमीला मोहम्मद नावाची टीचर शिकवत होती. त्यावेळी डानियालच्या मनात त्यांच्याविषयी केवळ आदर आणि सन्मानाची भावना होती. त्याला त्यांचा स्वभाव आवडत होता
पण जेव्हा मोहम्मद पुढील क्लासमध्ये गेला तर दोघांचा संपर्क तुटला. डानियाल सुद्धा जमीलाला विसरला होता. पण एकदा तो हेडमास्टरच्या ऑफिसमध्ये जात होता तेव्हा त्याला जमीला भेटली. त्याने जमीलाला हॅलो केलं आणि निघून गेला. त्यानंतर तो जमीलाला जास्तीत जास्त नोटीस करू लागला होता. त्याचवर्षी जमीलाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. दोघांमध्ये चॅटींग सुरू झालं आणि डानियाल याने जमीलाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं. पण जमीलाने त्याला नकार दिला. कारण दोघांच्या वयात फार अंतर होतं. डानियाल जमीलापेक्षा 26 वर्षाने लहान होता. पण डानियाल तिच्या प्रेमात होता.
डानियालने तिच्या घराचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पत्ता सापडला. तो तिच्या घरी गेला आणि पुन्हा एकदा मनातील भावना व्यक्त केल्या. बरंच समजावल्यानंतर जमीला तयार झाली आणि त्याचा आपल्या पतीच्या रूपात स्वीकार केला. दोघांनी परिवाराची परवानगी घेतली आणि लग्न केलं.
22 वर्षीय डानियालने आपल्या 48 वर्षीय टीचरसोबत 2021 मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी एका मशिदीमध्ये लग्न केलं. यावेळी परिवारातील लोक आणि मित्र आले होते. जमीला 2007 मध्ये आपल्या पतीपासून वेगळी झाली होती. तेव्हापासून ती तिच्या करिअरवर फोकस करत होती.