Male Goat Milk: येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 01:04 AM2022-11-17T01:04:57+5:302022-11-17T01:06:29+5:30

या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाबमधील प्रजातींचे 4 बोकड आहेत. हे बोकड रोज साधारणपणे 250 ग्रॅम दूध देतात.

Male Goat Milk madhya pradesh four male goat gives milk the price is up to 4 lakh rupees | Male Goat Milk: येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत

Male Goat Milk: येथे बकऱ्यांप्रमाणेच बोकडही देतात दूध, 4 लाख रुपयांपर्यंत आहे किंमत

googlenewsNext

बकरी दूध देते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, बोकडही दूध देतात हे आपल्याला माहीत आहे का? हे ऐकूण आपल्याला काहीसे विचित्र वाटले असेल. पण, हे खरे आहे.  मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथील सरताज फार्म हाऊसमध्ये चार बोकड रोज दूध देतात.

या फार्महाऊसमध्ये राजस्थान आणि पंजाबमधील प्रजातींचे 4 बोकड आहेत. हे बोकड रोज साधारणपणे 250 ग्रॅम दूध देतात. यांची शारीर बांधणी बोकडांप्रमाणेच आहे. मात्र, त्यांच्या गुप्तांगांवर बकऱ्यांप्रमाणे दोन स्तन आहेत. या बोकडांची किंमत 52 हजार रुपयांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, या बोकडांना पाहण्यासाठी दूरवरूनही लोक येतात.  हार्मोंसमधील काही बदलांमुळे अशा प्रकारची प्रकरणे समोर येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राजस्थानमधूनही समोर आले आहे असे प्रकरण - 
गेल्या काही वर्षांपूर्वी राजस्थानमधील धौलपूरमधूनही एक असेच प्रकरण समोर आले होते. येथे एक बोकड दूध देत असल्याने चर्चेचा विषय ठरले होते. पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकाच्या मते, हे प्राण्याच्या गर्भावस्थेत लिंग निर्धारणा दरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे होते. यावेळी, संबंधित बोकडाच्या मालकाने सांगितले होते, की बोकड खरेदी केल्याच्या सुमारे सहा महिन्यांनंतर त्याचे स्तन विकसित झाल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्याचे दूध काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दूध दिले. एढेच नाही तर, संबंधित बोकड रोज 200-250 ग्रॅम दूध देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.

Web Title: Male Goat Milk madhya pradesh four male goat gives milk the price is up to 4 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.