मॉलने केली 50% डिस्काउंटची घोषणा; लोकांची उगाडी झुंबड, केेरळमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:21 PM2022-07-10T21:21:56+5:302022-07-10T21:24:05+5:30
डिस्काउंटमध्ये वस्तू घेण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक मॉलमध्ये शिरले, मुंग्याप्रमाणे लांबच्या-लांब रांगा लावल्या.
कोचिन: तुम्ही अनेकदा मॉलमध्ये फिरायला गेला असाल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉलवाले वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट देत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात मॉलमध्ये हमखास डिस्काउंट ऑफर दिल्या जातात. हे डिस्काउंट पाहून ग्राहकांची मोठी गर्दी होते. पण, तुम्ही मॉलमध्ये एवढी गर्दी कधीच पाहिली नसेल. कर्नाटकमधील एका मॉलमध्ये हजारोंच्या संख्येने लोक घुसल्याची घटना समोर आली आहे.
Thread on some videos from #Lulumall, cochin !!
— Vineeth K (@DealsDhamaka) July 8, 2022
Looked like the entire Kochi was in the mall. Reminded me of Saravana stores, chennaipic.twitter.com/AscmYHFljM
मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील लुलू मॉलने मिड नाईट सेलदरम्यान ग्राहकांना 50 टक्के डिस्काउंटची ऑफर दिली. ही ऑफर देताना त्यांनी कल्पनाही नव्हती की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील. 50 टक्के डिस्काउंटने वस्तू घेण्यासाठी हजारोंच्या संख्यने ग्राहक मॉलमध्ये शिरले. हे लोक मॉलमध्ये शिरताना आणि लांबच्या लांब रांगा लावलेला व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 6 जुलै रोजी रात्री 11:59 ते सकाळी 7 दरम्यान मॉलने डिस्काउंट ऑफर दिली होती.
Remember iPhone launch queues ?
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) July 9, 2022
Here is our Kerala’s Lulu Mall sale queue at midnight:
pic.twitter.com/X4cCcFDbYi
मॉलच्या तिरुअनंतपुरम आणि कोची आउटलेट्समधून हे धक्कादायक फुटेज समोर आले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॉलचे कर्मचारी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसर्या व्हिडिओमध्ये मॉलच्या पायऱ्यांवर लाबंच्या लांब रांग लागलेली दिसत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या गर्दीची तुलना नोटाबंदीच्या काळात झालेल्या गर्दीशी केली.