दात हे वेगवेगळ्या डेंसिटी असलेल्या टिश्यूपासून तयार झालेले असतात. बालपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात असं म्हणतात. नंतर 6 ते 12 वयादरम्यान हे दात काही कारणांनी पडतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका 35 वयाच्या व्यक्तीचे सगळे दात पडले आणि त्याला हे दात पुन्हा लावायचे आहेत. त्याला त्यासाठी 36 लाख रूपये खर्च येणार आहे. त्याचे सगळे दात हे जेवण करताना पडले. दात पडल्यामुळे तो आता चावून काहीच खाऊ शकत नाही.
ज्या व्यक्तीचे सगळे दात पडले त्याचं नाव अलेक्झांडर स्टोइलोव असं आहे. तो इंग्लंडमधील आहे. आता अलेक्झांडरचं वय 35 आहे आणि 6 वर्षाआधी म्हणजे 29 वयाचा असताना त्याचे सगळे दात पडले होते. त्याने हे जेव्हा डॉक्टरांना सांगितलं तर तेही हैराण झाले.
काय आहे दात पडण्याचं कारण
एका वेबसाइटसोबत बोलताना अलेक्झांडरने सांगितलं की, मला वाटतं बालपणी मला अॅंटीबायोटीक दिलं असेल ज्यामुळे मला हा साइड इफेक्ट झाला. त्यामुळेच माझे सगळे दात कमजोर होऊन पडले. माझ्या तोंडात आता एकही दात नाहीये. मी जेव्हा डॉक्टरांशी बोललो तर ते म्हणाले की, माझ्या जबड्यातील दातांच्या मुळांना काढावं लागेल. असं केलं तर जबड्याच्या हाडांमध्ये इन्फेक्शनही होऊ शकतं. सध्या मला आरोग्यासंबंधी अनेक समस्याही होत आहेत.
तो म्हणाला की, बालपणी त्याला दातांसंबंधी काहीच समस्या नव्हती. कारण त्याच्या दातांची चांगली काळजी घेत होता. पण अचानक माझे दात पडणं सुरू झालं, ज्यामुळे मी हैराण झालो. जेव्हा माझा पहिला दात पडला तेव्हा मला धक्का बसला. कारण तेव्हा दात पडण्याचा मी विचारही केला नव्हता. मला काही समस्याही नव्हती. मी जेवण करत होतो अचानक दात पडला. त्यानंतर तीन आठवड्यात माझे 10 दात तुटले. पाच वर्षात माझे सगळे दात तुटले. महत्वाची बाब म्हणजे दात तुटले तेव्हा मला वेदना नाही झाल्या आणि ना हिरड्यांमधून रक्त आलं.
आता अलेक्झांडर कडक असं काहीच खाऊ शकत नाही. तो पिझ्झाही खाऊ शकत नाही. लोक मला नरम फूड्स खाण्याचा सल्ला देतात. माझी पत्नी अनेकदा मला शेक बनवून देते. पण यामुळे मला डायजेशनची समस्याही व्हायला लागली आहे.