जगात असे अनेक लोक असतात, ज्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच एका कपलची घटना चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी कारवर मातीचा ढिगारा टाकणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच असेही सांगितले जात आहे की, या घटनेवेळी कारमध्ये पकडल्या गेलेल्या व्यक्तीची गर्लफ्रेन्डही होती.
ओकालूसा काउंटी शेरिफ कार्यालयाने गेल्या गुरूवारी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिली होती की, हंटर मिल्स नावाच्या या व्यक्तीवर गंभीर अपराधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनुसार, २० वर्षीय मिल्सने त्याच्या गर्लफ्रेन्डला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी भेटण्यास बोलवले होते. ती आल्यावरच ही घटना घडली.
फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मिल्सची गर्लफ्रेन्ड २०१० मॉडलची एक पांढऱ्या रंगाची कॅडिलॅक कार घेऊन आली होती. ही कार तिची नव्हती. दोघांमध्ये बोलणं सुरू आणि नंतर गर्लफ्रेन्डने मिल्सच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. त्याला याचा राग आला आणि त्याने एका फ्रन्ट एंड लोडरने कारच्या छतावर मातीचा ढीग टाकला.
पोलिसांनी मिल्ससोबतच मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या कारचाही फोटो शेअर केलाय. सुदैवाने यात घटनेत तरूणीला काहीही झालं नाही. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, कारच्या खिडक्या उघड्या होत्या, ज्यामुळे कारच्या आत सगळीकड माती भरली गेली. त्यामुळे कारचं १ हजार डॉलरचं नुकसान झालं.