शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

बाबो! फक्त ३ मिनिटांत संपवले ८८ केक, पठ्ठ्याने केला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:55 PM

काही लोक मोठ्या डिशेस कमी वेळेत संपवण्याचं चॅलेंज (Food Challenge) स्वीकारताना आणि ते जिंकताना आपण पाहतो. सोशल मीडियावरही (Social Media food challenge video) अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात.

काही लोकांना खाण्या-पिण्याची खूप आवड असते. तुम्ही त्यांना कितीही पदार्थ खायला द्या, ते खाऊन पचवायचे कसे हेही त्यांना माहिती असतं. काही लोक मोठ्या डिशेस कमी वेळेत संपवण्याचं चॅलेंज (Food Challenge) स्वीकारताना आणि ते जिंकताना आपण पाहतो. सोशल मीडियावरही (Social Media food challenge video) अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात.

मॅक्स स्टॅनफोर्ड (Max Stanford) अशीच एक व्यक्ती आहे, की ज्याने या छंदातून विश्वविक्रम (World Record) केला आहे. डेझर्ट म्हणून कमी अधिक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जाफा केकचे (Jaffa Cake) ८८ तुकडे अवघ्या तीन मिनिटांत घशाखाली उतरवण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यानी केलं आहेत. हा विक्रम करण्यासाठी ३४ वर्षांच्या मॅक्स स्टॅनफोर्डने सरासरी दोन सेकंदात एक जाफा केक खाल्ला आणि तो घशातून खाली जावा यासाठी गरम पाणी पित राहिला.

अशा प्रकारे त्याने अत्यंत वेगात म्हणजेच केवळ तीन मिनिटांत ८८ जाफा केक सहा ग्लास गरम पाण्यासोबत अक्षरशः गिळले. त्यांचा हा वेग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. मात्र अशा पद्धतीनं खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी सांगितलं.

प्रोफेशनल ईटर (Professional eater) म्हणजेच केवळ खाद्यपदार्थ सेवनातून पैसे कमावणाऱ्या मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये जाफा केक्स खाऊन विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी १८० सेकंदात म्हणजेच ३ मिनिटांत ३६ जाफा केक खाल्ले होते. यावेळी मात्र त्यांनी ८८ केक खाल्ले. द सनच्या वृत्तानुसार, त्यांनी या स्पर्धेसाठी केवळ एकदाच सराव केला होता आणि ते हे रेकॉर्ड करण्यात यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी ४० सेकंदात २० केक खाल्ले होते. मात्र आपण ८८ केक खाऊ शकू असा विश्वास त्यांना नव्हता. पण सराव आणि प्रशिक्षणामुळे त्यांनी हे यश मिळवले.

मॅक्स स्टॅनफोर्ड हे नेहमी खाण्याचं चॅलेंज स्वीकारतात आणि खाण्याशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्यांचं एक युट्युब चॅनेल (Youtube Channel) असून, त्यावर ते आठवड्यातून एकदा खाण्याच्या चॅलेंजसंबंधीचा व्हिडीओ अपलोड करत असतात. त्यांनी नुकतंच ५.५ किलोग्रॅम चिकन टिक्का मसाला आणि भातासह २० चॉकलेट खाण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. ब्रिटनमधल्या दक्षिण लंडनचे रहिवासी असलेले मॅक्स खाण्याचे शौकीन असले तरी यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचं आवर्जून नमूद करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके