अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक घटना समोर आली आहे. इथे कथित रूपाने एका व्यक्तीने बॅंकेतील लोकांचे पैसे लांबवले. त्याने ६२ लाख रूपयांचा फ्रॉड केल्याचा आरोप आहे. त्याने पैशांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तो पकडला गेला.
Arlando Henderson ही व्यक्ती Charlotte financial Institution सोबत काम करते. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने ग्राहकांच्या डिपॉझिट अकाऊंटमधून ८८ हजार डॉलर चोरी केले. एकप्रकारे त्याने फ्रॉडच केला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ६३ लाख रूपयांपेक्षा अधिक होते. १८ वेळा त्यांनी लोकांच्या वेगवेगळ्या अकाऊंट्समधून पैसे चोरी केले.
त्याने पैसे चोरी केल्यावर पैशांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओ सुद्धा काढला. याच आधारे एफबीआयने त्याला अटक केली. या पैशांच्या माध्यमातून त्याने नवीन मर्सिडीज कारसाठी डाउन पेमेंटही केलं होतं. त्याने २० हजार डॉलर जमा केले होते.
सद्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून जर आरोप सिद्ध झाले तर त्याला ३० वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि १ मिलियन डॉलरची पेनल्टीही लागू शकते.