असं म्हणतात की, दारू जेवढी जुनी तेवढी चांगली लागते. अनेकदा लोक जुनी दारू मागताना दिसतात. खासकरून वाईन किंवा बीअर. असं मानलं जातं की, या जुन्या दारूचा रंग आणि टेस्ट खास असते. त्यामुळेच यांची किंमतही जास्त असते. तुम्ही वाचून अवाक् व्हाल की, एक व्यक्ती एक जुनी दारूची बॉटल विकून लखपती झाली. त्यांच्याकडे एक दारूची बॉटल होती, या बॉटलला लिलावात जी किंमत मिळाली ती वाचून तुम्ही थक्क व्हाल.
द वाशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार, कॅलिफ़ोर्नियामध्ये मार्क पॉलसन नावाच्या एका व्यक्तीने 1970 मध्ये Domaine de la Romanée-Conti La Tâche ची एक बॉटल खरेदी केली होती आणि तेव्हापासून आपल्या बेसमेंटच्या एका बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. त्यावेळी ही बॉटल त्यानी 250 डॉलर म्हणजे आजच्या 20 हजार रूपयात खरेदी केली होती. पण लिलावात या बॉटलला 106,250 डॉलरपेक्षा जास्त किंमत मिळाली. म्हणजे या व्यक्तीला बॉटलचे 87,83,846 रुपये मिळाले.
लिलाव करणारी संस्था बोनहम्स स्किनरनुसार, मार्चमध्ये या व्यक्तीने सांगितलं होतं की, त्याच्याकडे 50 वर्ष जुनी दारूची बॉटल आहे. तिला कधी त्याने हात लावला नाही. तेव्हा आम्ही ती लिलावासाठी ठेवली. आम्हाला अंदाज होता की, या बॉटलला 50 ते 80 हजार डॉलर किंमत मिळेल. पण 106,250 डॉलरमध्ये विकली गेली. ही फार रेअर दारू आहे.
पॉलसन एक व्यावसायिक चित्रकार होते. पण त्यांना खास वाईन घरात ठेवण्याची आवड होती. त्यांच्या एका मित्राने त्याना ही बॉटल खरेदी करण्यासाठी तयार केलं होतं. कारण ही एक अशी वस्तू होती जी कोणतीही व्यक्ती जीवनात एकदाच घेऊ शकत होती. ला टाचे इतकी दुर्मिळ आहे की, याच्या केवळ 1300 बॉटल जगभरात बनवल्या जातात. यातीलही जास्त 750 मिलीलीटरच्या बॉटल असतात. 3 लीटरच्या बॉटल फार कमी बनवल्या गेल्या.