महान सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मेंदू सगळ्यात शार्प होता. त्यामुळे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा एका डॉक्टरने त्यांचा मेंदू चोरी केला. नंतर समजलं की, या मेंदुचे दोनशे तुकडे करून ते रिसर्चसाठी वाटण्यात आले. यातून त्याने खूप कमाई केली. हा मेंदू सगळ्यांना तर मिळू शकत नाही. पण चीनचा एक तरूण ‘अल्बर्ट आइन्स्टाइनचा मेंदू’ विकून श्रीमंत झाला. त्याचा दावा आहे की, जे लोक याला खरेदी करतात त्यांचा मेंदुही अल्बर्ट आइन्स्टाइनसारखा होतो. खरेदी करणाऱ्या अनेकांनी याचे अनुभव शेअर केले. चला जाणून घेऊ या व्यक्तीची आयडिया...
साउथ चायना मार्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, झांग जियांग्शी नावाचा हा तरूण उत्तर चीनच्या हेबेई प्रांतात राहणारा आहे. 5 वर्षाआधी झांग पैसे कमावण्याची आयडिया शोधत होता. जेणेकरून त्याचे खर्च भागावे. त्याने मित्रांशी चर्चा केली. यादरम्यान गमतीने एकाने त्याला म्हटलं की, तुझ्याकडे बुद्धी कमी आहे. झांग घरी परतला आणि विचार करू लागला. तेव्हा त्याला एक पेटलेला बल्ब दिसला आणि तेव्हाच त्याला आयडिया सुचली. झांगने विचार केला की, व्हर्चुअल 'आइन्स्टाइन ब्रेन’ बनवावा. जो तो विकेल आणि लोकांचा मेंदुही चांगला होईल. सुरूवातीला हा एक खेळ वाटला, पण लोकांना यात इंटरेस्ट दाखवला तर झांगने याचा बिझनेस बनवला. आता याची चीनी ऑनलाइन प्लॅटफार्म ताओबाओवर याची खूप डिमांड आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, केवळ 0.5 युआन म्हणजे 6 रूपयांपेक्षाही कमी किंमतीत कुणीही याला खरेदी करू शकतं. झांगने दावा केला की, 'आइन्स्टाइनचा ब्रेन’ खरेदी करणारा व्यक्ती इंटेलिजंट होईल. झांगने आतापर्यंत 70 हजार लोकांना हा व्हर्चुअल मेंदू त्याने विकला. गेल्या दोन महिन्यात याची खूप डिमांड वाढली आहे. आता याला चीनमधील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफार्म अलीबाबावर याला विकलं जाणार आहे.
हजारो स्टुडंट चॅट शोमध्ये होतात सहभागी
याला खरेदी केल्यावर लोकांनी आपले अनुभव शेअर केले. काही म्हणाले की, ही एक शानदार गोष्ट आहे आणि याचा आपल्या मेंदुवरही प्रभाव दिसून येतो. पण जास्तीत जास्त लोक याला खेळ म्हणतात. म्हणाले की, याला खरेदी करणाऱ्यांना बुद्धीची गरज आहे. पण आइन्स्टाइनच्या मेंदुची नाही. झांगला याने काही फरक पडत नाही. तो म्हणाला की, मला जास्तीत जास्त लोकांना आनंद द्यायचा आहे. त्यांच्यासोबत बोलण्यानेही मला आनंद मिळतो. या कारणाने चीनमध्ये अनेक विश्वविद्यालयांमध्ये त्याला लेक्चरसाठी बोलवलं जातं. त्याच्या व्हर्चुअल चॅट शोमध्ये हजारो स्टुडंट सहभागी होतात.