कितीही पैसा कमावला तरी तो साठवून ठेवता आला नाही तर कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, असं लोक अनेकदा सांगतात. पण नाणी वाचवून तुम्हाला कोणी श्रीमंत झाल्याचं सांगितलं तर खोटं वाटेल, विश्वास बसणार नाही. पण हो हे खरे आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने 10 वर्षे नाणी वाचवली आणि आता नाणी विकून तो श्रीमंत झाला आहे.
नाणी जमा करायला केली सुरुवात
ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी नाणी जमा करण्याचा विचार केला आणि ती नाणी एका पिगी बँकेत ठेवण्यास सुरुवात केली. त्याने अशी पिगी बँक विकत घेतली होती जी लवकर फुटणार नाही, मग त्याने त्यात नाणी टाकायला सुरुवात केली. तब्बल 10 वर्षे त्याने हे काम केले.
जमा केलेली नाणी मौल्यवान
आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने जमा केलेल्या काही नाण्यांना बाजारात किंमत नाही पण त्या नाण्यांमध्ये वापरलेल्या साहित्याची किंमत जास्त होती. आज 10 वर्षांनंतर ती नाणी बाजारात विकायला गेल्यावर त्या नाण्यांच्या किमतीपेक्षा हजारपट जास्त किंमत मिळत आहे. मॅथ्यू नावाच्या या 36 वर्षीय व्यक्तीला जेव्हा कळले की त्याने जतन केलेली नाणी मौल्यवान आहेत, तेव्हा तो खूप आनंदी झाला.
एका मुलाखतीत मॅथ्यूने सांगितले की, त्याला माहित होतं की एक दिवस ही नाणी मोठ्या किंमतीला जातील. त्याच्याबरोबर अशीही अनेक नाणीही निघाली जी अत्यंत दुर्मिळ होती. ज्याची चांगली किंमत देण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं जुनं दुकान होतं आणि त्यात सर्व नाणी जतन करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात दुकान बंद झाल्यापासून त्याला ती विकायची होती. सध्या तो या नाण्यांसाठी बोली लावत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"