जगभरात अलिकडे भावनिक साथ फारच कमी मिळताना दिसते. जीवनात काही वाईट घडल्यावर रडण्यासाठी कुणी खांदा बनेल किंवा तुम्हाला हसवेल, असे लोक आता कमीच होत आहेत. अशातून एका व्यक्तीने जे केलं ते चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूझीलंडची घटना आहे. या व्यक्तीला त्याचा बॉस नोकरीहून काढणार होता. अशात ही व्यक्ती त्याच्यासोबत चक्क एक जोकर घेऊन गेला. पण का? चला जाणून घेऊन या का? चं उत्तर....
nypost.com ने दिलेल्या वृत्तानुसार, Joshua Jack एका अॅड एजन्सीमध्ये काम करतो. त्याला बॉसकडून एक मेल आला. त्याने असा अंदाज बांधला की, एकतर प्रोमशन होणार असेल नाही तर नोकरी जाणार असेल. या दोन्ही परिस्थितीत इमोशनल सपोर्ट गरजेचा आहे. त्यामुळे त्याने चक्क एका जोकरला हायर केलं. २०० डॉलरमध्ये भारतीय करन्सीनुसार, १४,२९५.५० रूपयात त्याने हा जोकर हायर केला.
Joshua याच्यानुसार, बॉससोबत मीटिंग चांगली राहिली. त्याच्या बॉसने त्याला सांगितले की, तू वातावरण फारच गंमतीदार केलंय. पण त्याला नोकरीहून काढण्यात आलं. मात्र, या गोष्टीचा अंत मजेदार झाला. लोकांमधील भावनिकता किंवा लोकांना मिळणारा भावनिक सपोर्ट कुठेतरी हरवत चाललाय याचं हे एक उदाहरण म्हणता येईल का?